Mannara Chopra Indigo Airlines : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राची चुलत बहीण आणि अभिनेत्री मन्नारा चोप्रा ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. मन्नारा ही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहते. आता मन्नारा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण त्याचं कारण तिचं काम नाही तर तिनं शेअर केलेला एक व्हिडीओ आहे. मन्नारानं विमानतळावरील एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्यासोबत विमानतळावर असं काही झालं की तिनं व्हिडीओ शेअर करत इंडिगो एअरलाइन्सवर नाराजी व्यक्त केली आहे. नेमकं काय झालं जाणून घेऊया...
मन्नारानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून काही व्हिडीओ शेअर केले आहेत. ज्यात ती इंडिगो एअरलाइन्सवर संताप व्यक्त केला आहे. व्हिडीओमध्ये तिनं एअरलाइच्या स्टाफरवर प्रवाशांना चुकीची वागणूक दिल्याचा देखील आरोप केला.
पाठिंबा देत नेटकरी म्हणाला, 'दिल्लीवरून अगरतला जाताना माझ्यासोबत असंच केलं होतं.' दुसऱ्यानं लिहिलं की 'गेल्या महिन्यात हैदराबाद विमानतळावर देखील माझ्यासोबत असचं झालं होतं.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'इंडिगो नेहमीचं असं करते.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'एअरलाइन अधिकाऱ्यांनी मन्नाराचा जो काही अपमान केला आणि तिची जी गैरसोय केली त्यासाठी कर्मचाऱ्यांच्या विरोधात कारवाई करायला हवी आणि डीजीसीएने नियोजित वेळेपूर्वी फ्लाय केल्याबद्दल इंडिगो एअरलाइन्सवर कायदेशीर कारवाई करायला हवी.'
हेही वाचा : आता लडाख ट्रिप नसणार खर्चिक! Connectivity साठी मोदी सरकाराचा मास्टर प्लॅन
कामाला घेऊन बोलायचं झालं तर मन्नारा ही 'लाफ्टर शेफ सीझन 2' मध्ये दिसणार आहे. त्याशिवाय मन्नारा चोप्रा ही बिग बॉससाठी ओळखली जाते.