मुंबई: देशात कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा झपाट्यानं वाढत असतानाच आता बॉलिवूडमध्ये देखील कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाला आहे. बॉलिवूडमध्ये रणबीर कपूर आणि संजय लीला भन्साळीनंतर अभिनेता मनोज बाजपेयी यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मनोज बाजपेयी यांनी स्वत:ला क्वारंटाइन केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनोज यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर तातडीनं सिनेमाचं शूटिंग देखील थांबवण्यात आलं. गेल्या काही दिवसांपासून ते वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर काम करत होते. त्यांचा फॅमिली मॅन ही वेब सीरिज खूप गाजली आहे. त्याच्या दुसऱ्या भागाची सर्वांनाच प्रतिक्षा आहे. 


मनोज बाजपेयी यांनी घरी स्वत: ला होम क्वारंटाइन केलं आहे. कोरोना होण्याआधी ते एका सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होते. त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे हे शूटिंग देखील सध्या बंद करण्यात आलं आहे. ते पूर्ण बरे झाल्यानंतरच पुन्हा शूटिंग सुरू करण्यात येईल अशी सध्या माहिती मिळाली आहे. 



फॅमिली मॅन 2 ह्या वेब सीरिजवर देखील त्यांचं काम सुरू होतं. याशिवाय ते एका चित्रपटातून देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशा परिस्थितीत अभिनेता कोरोना पॉझिटिव्ह झाल्यामुळे चाहते नाराज आहेत.


डिस्पॅच या चित्रपटातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार होते. या चित्रपटात ते पत्रकाराची भूमिका निभावणार आहेत. क्रईम जर्नलिझमवर आधारीत हा सिनेमा असणार आहे. हा सिनेमा डिजिटल रिलीज होणार आहे. मात्र सध्या या सिनेमाचं शूटिंग थांबवण्यात आलं आहे.


मनोज यांच्या टीमनं दिलेल्या माहितीनुसार या सिनेमाचे डायरेक्टर कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी आपली टेस्ट केली. त्यावेळी त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. मनोज यांची तब्येत ठिक असून उपचार सुरू असल्याची माहिती टीमनं दिली आहे.