'माझी मातृभाषा मराठी, पण विचार उर्दूमध्ये करतो', सचिन पिळगांवकर यांचं विधान चर्चेत

Sachin Pilgaonkar : मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी एका मुलाखतीत उर्दू भाषेविषयी एक मोठं विधान केलं आहे. ज्यामुळे ते सध्या खूपच चर्चेत आले आहेत. काय आहे ते विधान?    

सोनेश्वर पाटील | Updated: Oct 7, 2025, 02:22 PM IST
'माझी मातृभाषा मराठी, पण विचार उर्दूमध्ये करतो', सचिन पिळगांवकर यांचं विधान चर्चेत

Sachin Pilgaonkar : ज्येष्ठ मराठी अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी मराठी चित्रपटसृष्टीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीत देखील आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. बालकलाकार म्हणून त्यांनी अभिनयाची सुरुवात केली आणि त्यांच्या करिअरमधील विविध टप्प्यांमध्ये त्यांनी अभिनयाची गुणवत्ता कायम ठेवली आहे.

Add Zee News as a Preferred Source

सचिन पिळगांवकर हे केवळ अभिनयासाठीच नव्हे तर उर्दू भाषेसाठीही विशेष ओळखले जातात. अनेक मुलाखतींमध्ये त्यांनी सांगितले आहे की, त्यांना अभिनेत्री मीना कुमारी यांनी उर्दूचे धडे दिले होते ज्यामुळे त्यांचे उर्दूवरचे प्रेम अधिक वाढले आहे.

 'माझी मातृभाषा मराठी, पण विचार उर्दूमध्ये करतो'

‘बहार-ए-उर्दू’ या कार्यक्रमात बोलताना अभिनेते सचिन पिळगांवकर म्हणाले की, माझी मातृभाषा ही मराठी आहे पण मी माझे विचार उर्दूमध्ये करतो. उर्दू माझ्या जीवनाचा एक भाग आहे. त्यासोबत ते पुढे म्हणाले की, रात्री तीन वाजता कोणीही त्यांना उठवले तरी ते उर्दूमध्ये बोलत उठतात. एवढंच नाही तर झोपताना सुद्धा त्यांचे बोलणे हे उर्दूमध्येच असते.

सचिन पिळगांवकर यांच्या उर्दू प्रेमाची मजा त्यांच्या बायकोलाही आवडते. ते म्हणाले, 'उर्दू ही एक अशी सवत आहे जी माझ्या बायकोलाही खूप आवडते. आम्ही दोघेही हळूहळू उर्दूचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात करतो असं ते म्हणाले. सचिन पिळगांवकर यांचे हे उर्दू प्रेम त्यांच्या अभिनयातही दिसून येते. त्यांच्या अभिनय शैलीतही उर्दू शब्दांची नाजूकता आणि सौंदर्य जाणवते. ज्यामुळे त्यांच्या संवादांमध्ये वेगळाच रंग भरतो.

मराठी आणि हिंदी सिनेमात आपली ओळख

अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी मराठी चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपट केले आहेत. ज्यामध्ये  ‘स्नेहप्रेमी’, ‘सावित्री’ आणि ‘नटसम्राट’सारख्या अनेक चित्रपटांमधील त्यांचा अभिनय खूप चर्चेत राहिला आहे.  हिंदी सिनेमातही त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आणि बालकलाकार म्हणून सुरू झालेला प्रवास अखेर प्रौढ अभिनयापर्यंत पोहोचला.

सचिन पिळगांवकर हे उर्दूवरील आपले प्रेम आणि त्यातील रसिकता सार्वजनिक करुन, मराठी आणि हिंदी चित्रपटप्रेक्षकांसमोर उर्दू भाषेची सौंदर्यपूर्ण बाजू सादर करत आहेत.

FAQ

सचिन पिळगांवकर यांचे करिअर कसे सुरू झाले?

सचिन पिळगांवकर यांनी बालकलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात केली. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत विविध भूमिका साकारून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली.

उर्दू प्रेमाची सुरुवात कशी?

मीना कुमारी यांनी सचिन पिळगांवकर यांना उर्दूचे धडे दिले, ज्यामुळे त्यांचे उर्दूवरचे प्रेम वाढले. ‘बहार-ए-उर्दू’ कार्यक्रमात त्यांनी हे सांगितले.

सचिन पिळगांवकर यांचे उर्दू प्रेम कसे दिसते?

सचिन पिळगांवकर म्हणतात, ‘माझी मातृभाषा मराठी, पण मी विचार उर्दूमध्ये करतो. रात्री तीन वाजता उठवले तरी उर्दूमध्ये बोलतो आणि झोपतानाही उर्दू बोलतो.’

त्यांच्या बायकोला उर्दू आवडते का?

होय, सचिन पिळगांवकर यांच्या बायकोलाही उर्दू आवडते. ते म्हणतात, ‘उर्दू ही सवय आहे जी आम्ही दोघे दैनंदिन जीवनात करतो.’

उर्दू त्यांच्या अभिनयात कसे दिसते?

उर्दू शब्दांची नाजूकता आणि सौंदर्य त्यांच्या संवादांमध्ये जाणवते, ज्यामुळे त्यांच्या भूमिका वेगळ्या रंगतदार होतात.

About the Author

Soneshwar Patil

सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

...Read More