'...म्हणून घोड्यावर उलटं टांगलेलं'; उर्दूप्रेमावरून सचिन पिळगावकर क्लिन बोल्ड

sachin pilgaonkar statement on urdu language: सचिन पिळगावकरांच्या उर्दूप्रेमावरील वक्तव्यामुळे सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केलं जात आहे  

Updated: Oct 9, 2025, 11:57 AM IST
'...म्हणून घोड्यावर उलटं टांगलेलं'; उर्दूप्रेमावरून सचिन पिळगावकर क्लिन बोल्ड

Sachin Pilgaonkar statement on urdu language: मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांपैकी एक असलेले  सचिन पिळगावकर (sachin pilgaonkar)  पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मात्र, यावेळी कारण काही निराळं आहे. उर्दू भाषेबाबतचं वक्तव्य त्यांना चांगलंच भोवलंय. अलीकडेच महाराष्ट्र उर्दू साहित्य अकादमीच्या  सुवर्णमहोत्सवी “बहार-ए-उर्दू” या कार्यक्रमाला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

Add Zee News as a Preferred Source

कार्यक्रमादरम्यान उर्दू भाषेवर बोलताना त्यांनी म्हटलं “माझी मातृभाषा मराठी आहे, पण मी उर्दूमध्ये विचार करतो. जर मला रात्री 3 वाजता उठवलं, तरी मी उर्दूमध्येच बोलतो.” त्यांच्या या वक्तव्याने सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडाली आहे. काहींनी त्यांच्या भाषेवरील प्रेमाचं कौतुक केलं, मात्र अनेकांनी त्यांना ट्रोलही केलं. काही नेटकरी म्हणाले, “मग मराठीऐवजी उर्दू चित्रपटांमध्येच काम करायला हवं होतं!” तर काहींनी गमतीशीर कमेंट्स करून त्यांना क्लिन बोल्ड केलं.

सचिन पिळगावकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असून. ‘अशी ही बनवाबनवी’, ‘गंमत जंमत’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, 'आम्ही सातपुते', 'नवरा माझा नवसाचा' असे अनेक सुपरहिट चित्रपट त्यांनी दिले आहेत. अभिनयासोबत ते दिग्दर्शक, गायक आणि नृत्यकलावंत म्हणूनही प्रसिद्ध आहेत. मात्र, अलीकडे त्यांच्या मुलाखतींतील वक्तव्यांमुळे ते अनेकदा चर्चेत राहिले आहेत. .

व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ZEE 24 TAAS (@zee24taas)

अश्या आहेत नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
पिळगावकरांच्या या वक्तव्यावर kakulith नावाच्या नेटकऱ्याने फिरकी घेत 'शोले मुव्हीमधल्या रोलचा परिणाम अजून गेला नाही वाटतं...'...म्हणून घोड्यावर उलटं टांगलेलं'.' तर दुसऱ्या नेटकाऱ्याने 'त्याच्यावर मानसिक उपचार सुरु आहेत असं सांगितलंय' तर तिसऱ्याने थेट गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये एम आर आय कधी असं सांगितलंय', असं म्हटलं. या नव्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा नेटिझन्समध्ये पिळगावकरांचा मुद्दा चर्चेत असून, काहींना त्यांच्या भावनेत प्रामाणिकपणा दिसतोय, तर काहींना ती मराठी संस्कृतीवरची टीकाही दिसत आहे.

About the Author