Subodh Bhave in Swatantrya Veer Savarkar : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असलेला 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चित्रपट आज मराठी भाषेत सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता रणदीप हुड्डा हा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमिकेत झळकत आहे. तसेच यात अभिनेत्री अंकिता लोखंडेने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाबद्दल सिनेसृष्टीतून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. आता मराठमोळे अभिनेते सुबोध भावे यांनी या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुबोध भावे हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. तो नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो. नुकतंच सुबोध भावेने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटाचे पोस्टर पोस्ट केले आहे. या पोस्टला कॅप्शन देताना त्याने हा चित्रपट कसा वाटला, याबद्दल सांगितले आहे. 


सुबोध भावेची पोस्ट


"आजपासून सर्वत्र सावरकर हा चित्रपट मराठीमध्ये प्रदर्शित होत आहे. आदरणीय सुधीर फडके यांची निर्मिती असलेल्या "वीर सावरकर " या चित्रपटात मी एका ब्रिटिश पोलिस ऑफिसर चि छोटीशी भुमिका केली होती. आणि आज रणदीप हुडा अभिनीत "सावरकर " या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या सावरकरांच्या भूमिकेला मराठीमध्ये आवाज देण्याची संधी मला मिळाली. आवर्जून हा चित्रपट पहा. केवळ विनायक दामोदर सावरकर नाही तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांनी केलेल्या असीम त्यागाची ही कहाणी. ही प्रखर देशभक्त सावरकरांची कहाणी. रणदीप हुडा यांनी साकारलेले सावरकर अवर्णनीय आहे. त्यांच्या जिद्दीला आणि मेहनतीला एक अभिनेता म्हणुन मनापासून सलाम", असे सुबोध भावेने म्हटले आहे. 



दरम्यान 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटाने आतापर्यंत 11.35 कोटींचा गल्ला जमवला आहे.  या चित्रपटातून स्वातंत्र्यवीर सावरकरांची देशभक्ती, त्यांचं राजकीय व सामाजिक कार्य दाखवण्यात आले आहे.  ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचं दिग्दर्शन, सहलेखन व सहनिर्मिती रणदीप हुड्डाने केले आहे. या चित्रपटात अमित सियाल, राजेश खेरा, लोकेश मित्तल, ब्रजेश झा, संतोष ओझा, राहुल कुलकर्णी, मृणाल दत्त, संजय शर्मा, सल यूसुफ हे कलाकार झळकत आहे. विशेष म्हणजे 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटात अभिनेता सुबोध भावेने ब्रिटिश पोलिस ऑफिसरची भूमिका साकारली आहे. तसेच मराठी भाषेत प्रदर्शित झालेल्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटांच्या भूमिकेला सुबोध भावेचा आवाज दिला आहे.