'बिकीनी घालून फोटो टाकते अन् लोक...'बिकिनी घालण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर

Ruchira Jadhav on Bikini Troll : अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या बिकीनी फोटोमुळे तिला ट्रोल केलं जातंय. पण या सगळ्यांना सडेतोड उत्तर देण्यात आलं आहे.

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 6, 2025, 06:59 PM IST
'बिकीनी घालून फोटो टाकते अन् लोक...'बिकिनी घालण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री रुचिा जाधव सोशळ मीडियावर खूप ऍक्टिव आहे. आपल्या निगेटिव्ह व्यक्तिरेखांमधून ती चर्चेचा विषय ठरला आहे. रुचिरा आपल्या बिकिनी फोटोंमुळे चर्चेत आहे. या बोल्ड आणि ब्युटीफुल लूकमुळे तिला ट्रोल करण्यात आलं आहे. या ट्रोलर्सला रुचिराने सडेतोड उत्तर दिलं आहे. 

Add Zee News as a Preferred Source

रुचिरा जाधव काय म्हणाली?

रुचिरा जाधव म्हणाली की, मी कृष्णाच्या मंदिरात पण जाते. मग समुद्रावरचे स्विम सुट किंवा बिकिनी मधील म्हणू हवं तर... ते सगळे फोटो जर मला सोशल मीडियावर टाकावेसे वाटले तर मी ते टाकत असते. मग याबद्दल लोक का त्यांचं एकत्रिकरण करतात. या दोन वेगवेगळ्या पोस्ट आहेत ना! माझ्या इस्कॉन मधल्या मंदिराच्या फोटो खाली जर ते फोटो असतील तर तुम्ही असं नाही म्हणू शकत की हीच बाकीचं ही प्रोफाइल पहा... ती सुद्धा मी आहे आणि ही सुद्धा मीच आहे. मला माझ्या दोन्ही बाजू कशा सांभाळायचा या माहित आहेत, असं रुचिरा म्हटली आहे.

कुठे काय घालायचं हे मला कळतं. मी मंदिरात साडी किंवा ड्रेस घालते. किंबहुना जशी असेल तशी जाते. समजा कधी मी शूट वरून लवकर फ्री झाले तर मी तोंडावर स्कार्फ गुंडाळून तिथे जाते. मंदिरात आपण मेकअप वगैरे करून जात नाही. रुचिरा जाधवच्या कामबद्दल बोलायचे झाल्यास ती सध्या स्टार प्रवाहवरील तू ही रे माझा मितवा या मालिकेत नकारात्मक भूमिकेत पाहायला मिळत आहे. रुचिराच्या आगामी कामाबद्दल चाहते देखील उत्सुक आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ruchira Jadhav (@ruchira_rj)

मंदिरात गेल्यावर देवाबद्दलच्या भावना महत्वाच्या असतात. शूटवरून सुटल्यावर जर मला मंदिरात जावं वाटलं तर मी व्यवस्थित कपडे घालून जाते. देवाजवळ जाताना त्याच्याबद्दलच्या आपल्या भावना महत्वाच्या असतात. त्यामुळे बाहेर जाताना कधी काय घालायचं आणि कधी काय नाही ते मला कळत.

रुचिरा जाधव कोण आहे? 

रुचिरा जाधव ही एक लोकप्रिय मराठी अभिनेत्री आणि मॉडेल आहे. ती मुख्यतः मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करते. तिच्या प्रसिद्ध भूमिका म्हणजे 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील 'माया' ही भूमिका. ती २०२२ मध्ये 'बिग बॉस मराठी ४' मध्ये स्पर्धक म्हणून दिसली होती. तिचे इन्स्टाग्राम अकाउंट @ruchira_rj
 वर 487K पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

रुचिरा जाधवचे वय किती आहे?
रुचिरा जाधवचा जन्म 13 जुलै 1989 रोजी झाला.  तिचे वय 36 वर्षे आहे.

रुचिरा जाधवचे शिक्षण काय आहे?
रुचिराने प्राथमिक शालेय शिक्षण 'पराग विद्यालय', भांडुप (पश्चिम), मुंबई येथून पूर्ण केले. नंतर तिने 'के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स', घाटकोपर (पूर्व), मुंबई येथून पदवी पूर्ण केली. कॉलेजमध्ये ती सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय होती.

रुचिरा जाधवचे कुटुंब कसे आहे?
रुचिराचे वडील रवींद्र जाधव, आई माया जाधव आणि बहीण रुतुजा जाधव आहे. तिचे कुटुंब मुंबईत राहते. तिचे वैवाहिक जीवन एकटरी आहे, पण ती डॉ. रोहित शिंदे (मॉडेल आणि सेलिब्रिटी) सोबत रिलेशनशिपमध्ये आहे. हे दोघे 'बिग बॉस मराठी 4' मध्ये कपल एंट्रीने आले होते.

About the Author

Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

...Read More