मुंबई : कट्टर शिवसैनिक काय असतो, हे सांगण्यासाठी आधी आनंद दिघे व्हावं लागतं असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. 'धर्मवीर' या चित्रपटाचा ट्रेलर पाहून तुम्हीही असंच म्हणाल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेचं एक पर्व गाजवणारे आणि ठाणेकरांसाठी विशेष जीव ओतणारा नेता म्हणून आनंद दिघे यांच्याकडे सातत्यानं पाहिलं गेलं. आनंद दिघेंकडे आल्यावर अन्यायाला वाचा फुटलीच म्हणून समजा. (Anand Dighe Dhrmaveer Trailer )



पुरावे समोर आणून अन्यायाला समूळ नष्ट करण्यासाठीच दिघेंनी कायम प्रयत्न केले. हिंदुत्त्वासाठी प्राण पणाला लावणाऱ्या पण, धर्माच्या राजकारणात चुकीची पावलं न उचलणाऱ्या नेत्यांपैकी दिघे एक. (Dhrmaveer Trailer Video )


आनंद दिघे यांच्या राजकीय कारकिर्दीत नेमक्या कोणत्या घडामोडी घडल्या आणि त्या प्रत्येक प्रसंगाला ते कसे सामोरे गेले हे सर्वच या चित्रपटातून साकारण्यात आलं आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित या चित्रपटामध्ये अभिनेता प्रसाद ओक यानं मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. 


प्रसादने साकारलेले आनंद दिघे पाहताना त्यानं या व्यक्तीरेखेसाठी घेतलेली मेहनत लगेचच लक्षात येत आहे. अवघ्या दोन अडीच मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये आनंद दिघे आपल्याला लगेचच कळत आहेत ते कलाकारांच्या मेहनतीमुळं. (Prasad oak)


'हिंदू असणं गुन्हा झालाय... बहुसंख्य आहोत पण एकसंध नाही' असं आनंद दिघे का म्हणाले होते हे ट्रेलर पाहताना लक्षात येत आहे. जिथं सध्या हिंदू - मुस्लीम हा वाद अगदी क्षुल्लक कारणानंही टोकाशी जात आहे तिथं, 'डोक्यावर टोपी घालून फिरणारा नव्हे, डोक्यात जिहाद घेऊन फिरणारा मुसलमान माझा शत्रू... बाकी सगळे आपलेच' असं म्हणाऱ्या आनंद दिघेंना पाहिलं की, राजकारणीही निस्वार्थी असतात यावर विश्वास बसत आहे. 


समर्पक कथानक आणि  त्याला कलाकारांची जोड मिळालेला 'धर्मवीर' हा चित्रपट 13 मे 2022 ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता ही डरकाळी नेमकी कुठवर जाते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.