मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि प्रसिद्ध मॉडेल मिलिंद सोमण अनेकदा त्याच्या सोशल मीडिया पोस्ट्समुळे चर्चेत असतो. याशिवाय तो त्याच्या फिटनेससाठीही ओळखला जातो. अलीकडेच, अभिनेता रस्त्याच्या मध्यभागी आंघोळ करताना दिसला आणि त्याने हा व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्रामवर देखील शेअर केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिलिंदचा व्हिडिओ
मिलिंद सोमण सोशल मीडियावर त्याच्या वर्कआउटचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसत आहेत. यासोबत, तो चाहत्यांना त्याच्या पोस्टद्वारे फिट राहण्यासाठी टिप्स देत असतो. त्याचबरोबर त्याच्या मजेदार आणि वेगळ्या स्टाईलचे व्हिडिओही सोशल मीडियावर पाहायला मिळतात. त्याने पुन्हा एकदा असाच एक व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो रस्त्याच्या मधोमध आंघोळ करताना दिसत आहे. मिलिंदचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


गात-गात मिलिंदने केली आंघोळ 
मिलिंद सोमणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये मिलिंद सोमण पावसात रस्त्याच्या मध्ये बसून डोक्यावर मगातून पाणी ओतताना दिसत आहे. यासोबत, धमाल करत, 'थंडे थंड पानी से न्हाना चाहिये' हे गाणं गात तो आंघोळ करत आहे.


मिलिंदचं कॅप्शन
मिलिंदने या व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ''शूट मजेदार आहे! गरम पाणी, थंड पाऊस, पावसाळ्यात मध्यरात्री जे लोक विचार करत राहतात की, मी पुशअप्स आणि धावण्याव्यतिरिक्त काही करतो का, तर ही दुसरी गोष्ट आहे, मूव्ही आ रहा है.'' मिलिंद सोमण हा मजेदार व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे.


लवकरच होणार शोचा जज
मिलिंद सोमण टॉप मॉडेलपैकी एक आहे. तो त्याच्या फिटनेससाठी प्रसिद्ध आहे. मिलिंद सोमण आपल्या चाहत्यांशी संपर्कात राहण्यासाठी कायम सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतो. तो लवकरच 'इंडियाज नेक्स्ट टॉप मॉडेल'मध्ये जज म्हणून दिसेल. या शोमध्ये मिलिंदसोबत अनुषा दांडेकर आणि मलायका अरोरा देखील दिसणार आहेत.