मुंबई : ज्येष्ठ नागरिकांवर होणारे हल्ले किंवा एका वयानंतर त्यांच्याकडे बघण्याचा बदलेला दृष्टीकोन या सगळ्यावर 'सिनिअर सिटीझन' Senior Citizen सिनेमातून भाष्य केलं आहे. सिनेमात मोहन जोशी प्रमुख भूमिकेत आहेत. 'सिनिअर सिटीझन'पेक्षा 'सिरियस सिटीझन' म्हणणं सर्वाधिक चांगल असणार आहे. असं मोहन जोशी या सिनेमात सांगतात.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा सिनेमा एका निवृत्त इंडियन आर्मीच्या जीवनवर आधारीत आहे. सिनेमात मोहन जोशी,स्मिता जयकर, अमृता पवार मुख्य भूमिकेत दिसणार असून १३ डिसेंबरला सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे. अभिनेता सुयोग गोऱ्हे, अमृता पवार, स्नेहा चव्हाण, श्रुती बोराडीया,किरण तांबे, अमोल जाधव, गौरीश शिपूरकर, हर्षल पवार आदी कलाकारांच्या या सिनेमात भूमिका साकारत आहेत. 



सिनियर सिटीझन या अजय फणसेकर दिग्दर्शित  यांच्या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी प्रमुख भूमिकेत आहेत. ॐ क्रिएशन्सच्या माधुरी नागानंद, विजयकुमार नारंग यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. राजू सावला  क्रिएटिव्ह प्रोड्यूसर, प्रमोद मोहिते कार्यकारी निर्माते,  बी. लक्ष्मण यांनी छायांकन आणि राकेश कुडाळकर यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. तर अभिजित नार्वेकर यांनी संगीत आणि नृत्य दिग्दर्शक म्हणून अमित बाईंगने काम पाहिले आहे.



'रात्र आरंभ’, ‘एनकाऊंटर’, यही है जिंदगी  "एक होती वादी', 'रामचंद्र पुरुषोत्तम जोशी', 'चीटर'असे उत्तमोत्तम चित्रपट दिग्दर्शित केलेल्या अजय फणसेकर यांनी "सिनियर सिटीझन" हा नवा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. सिनियर सिटीझन आणि तरूण यांना एकत्र आणणारं काय रंजक कथानक या चित्रपटात असेल याचं कुतुहल निर्माण झालं आहे.