जयललिता साकारण्यासाठी कंगनाला करावं लागलेलं 'हे' काम

फोटो पाहून व्हाल हैराण.....

Updated: Feb 25, 2020, 07:38 AM IST
जयललिता साकारण्यासाठी कंगनाला करावं लागलेलं 'हे' काम title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : बायोपिकच्या ट्रेंडमध्ये अभिनेत्री kangna ranaut कंगना राणौत हिची महत्त्वाची भूमिका असणारा आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. राजकीय वर्तुळात कमालीचा दबदबा असणाऱ्या जयललिता यांच्या जीवनप्रवासावर प्रकाशझोत टाकणारा हा चित्रपट म्हणजे thalaivi 'थलायवी'. य़ा चित्रपटासाठी कंगनाने सुरुवातीपासूनच प्रचंड मेहनत घेतली होती. ज्याची झलक चित्रपटाच्या टीझरमधूनही पाहायला मिळाली. सध्या बी- टाऊनची ही क्वीन पुन्हा एकदा 'थलायवी'मुळेच चर्चेत आहे. 

जयललिता jayalalithaa यांच्या ७२व्या जयंतीनिमित्त या चित्रपटातील कंगनाचा आणखी एक लूक प्रेक्षकांच्या भेटीला आणला गेला. यामध्ये सफेद रंगाची साडी, कपाळावर लाल रंगाची टीकली आणि चेहऱ्यावर एक प्रकारचं स्मितहास्य असं एकंदर तिचं रुप दिसत आहे. कंगनाने जयललिता यांची भूमिका साकारण्यासाठी घेतलेली ही मेहनत आणि अंतिम रुपी पाहायला मिळालेला तिचा लीक पाहता अनेकांनीच तिची प्रशंसा केली आहे. 

जयललिता यांची भूमिका साकारण्यासाठी कंगनाला बऱ्याच गोष्टींमध्ये बदल करावे लागले. ज्यामध्ये तिच्या खाण्यापिण्याच्या सवयींपासून बोलण्याच्या सवयींचाही समावेश होता. एका मुलाखतीत तिनं सांगितल्यामप्रमाणे ही भूमिका साकारण्यासाठी तिला हार्मोन पिल्स घ्याव्या लागल्या होत्या. कंगना सडपातळ बांध्याची होती. तिचा चेहराही गोलाकार नव्हता. त्यामुळे या भूमिकेसाठी तिला या पिल्स घ्याव्या लागल्या होत्या. शिवाय वजन वाढवण्यासाठी तिने खाण्याच्या सवयींवरही काम केलं होतं. 

पाहा : मनोहर जोशींची नात कलाविश्वात भलतीच चर्चेत

जयललिता यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित असणार आहे. ज्यामध्ये त्यांच्या जीवनप्रवासाची अनेक पैलू उलगडले जाणार आहेत. जयललिता या एक राजकीय व्यक्तीमत्त्व म्हणून सर्वांमध्येच वावरत होत्या. पण, त्यांच्या जीवनातील असेही काही पैलू होते जे अनेकांना ठाऊकही नव्हते. असेच पैलू या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. २६ जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.