सोशल मीडियावर चर्चेत मायराची भन्नाट बकेट लिस्ट; नेटकरी म्हणतात…

एका नव्या मुलाखतीत सोशल मीडियावर चर्चेत असलेली अभिनेत्री मायरा वायकूळने तिच्या बकेट लिस्टबद्दल सविस्तर माहिती दिली. तिने सांगितलं की... 

Intern | Updated: Oct 10, 2025, 08:22 PM IST
सोशल मीडियावर चर्चेत मायराची भन्नाट बकेट लिस्ट; नेटकरी म्हणतात…

सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री मायरा वायकूळ चर्चेत आहे. तिच्या नुकत्याच एका मुलाखतीमुळे तिला प्रचंड प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. काही नेटकऱ्यांनी तिचं बालपण हरवलं असल्याचंही म्हटलं आहे. अशातच आता तिची आणखी एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जिथे मायरा तिच्या बालपणीच्या स्वप्नांबाबत खुलासा करताना दिसते.

Add Zee News as a Preferred Source

जुनी मुलाखत आणि रॅपिड फायर राऊंड

गणेशोत्सवानिमित्त ‘लोकसत्ता’ ला दिलेल्या मुलाखतीत मायरा वायकूळला रॅपिड फायर राऊंडमध्ये सहभागी व्हायला सांगितलं गेलं. यावेळी तिला 'उकडीचा मोदक की तळलेला मोदक?' असा प्रश्न विचारला असता, मायरा म्हणाली 'उकडीचा मोदक.'
तिला 'शाळेतील मैत्रिणी की सेटवरच्या मैत्रिणी?' असा प्रश्न विचारल्यावर तिने उत्तर दिलं 'दोन्ही.'

मायरा वायकूळच्या स्वप्नांबाबत

मुलाखतीत तिला विचारलं गेलं की, मोठं होऊन तिला काय व्हायचं आहे? त्यावर मायरा म्हणाली, 'माझी बकेट लिस्ट आहे. मला पायलट बनायचंय, मला एअर हॉस्टेस बनायचंय, मला अभिनेत्री बनायचंय. एवढ्या चार गोष्टींपैकी मला ठरवायचं आहे की, मला नेमकं काय करायचं आहे.'

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

मायराच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी म्हटलं, 'खरंच ओव्हर अँक्टिंग आहे… vlog मध्ये ही अशी नाही बोलत किंवा मोठ्या मुलींसारखे हावभाव नसतात.' 'नाकापेक्षा मोती जड आहे ही मायरा. वयापेक्षा जास्तच समजूतदार वाटते आहे, पण ह्यामुळे तिचं बालपण हरवत आहे.' 

कामगिरी आणि सोशल मीडियावरील सक्रियता

मायरा वायकूळला ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून घराघरात ओळख मिळाली. या मालिकेत तिने परीची भूमिका साकारली होती. त्याचबरोबर ती काही म्युजिक व्हिडिओंमध्येही दिसली आहे. शिवाय ‘मुक्काम पोस्ट – देवाचं घर’ सिनेमातही तिने मुख्य भूमिका साकारली आहे. मायरा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते आणि तिच्या रील्स चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. मायराच्या या जुनी मुलाखतीच्या व्हिडिओने चाहत्यांमध्ये पुन्हा चर्चेला गती दिली असून, तिच्या बालपण आणि स्वप्नांविषयी चर्चा रंगली आहे.

FAQ

मायरा वायकूळची जुनी मुलाखत का व्हायरल झाली?

मुलाखतीत मायरा वायकूळने बालपणीच्या स्वप्नांबाबत आणि बकेट लिस्टबाबत खुलासा केला होता. सोशल मीडियावर हे व्हिडिओ परत शेअर झाल्यामुळे ती चर्चेत आली.

मायरा वायकूळच्या बकेट लिस्टमध्ये काय आहे?

मायरा म्हणाली की तिला मोठं होऊन पायलट, एअर हॉस्टेस आणि अभिनेत्री बनायचं आहे. या चार स्वप्नांमधून तिने ठरवायचं आहे की तिला नेमकं काय करायचं आहे.

मायराच्या मुलाखतीवर नेटकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या?

नेटकऱ्यांनी काही प्रमाणात तिला ट्रोल केलं आहे. काहींनी म्हटलं की ती ओव्हर अँक्टिंग करते, तिचं बालपण हरवलं आहे, तर काहींनी तिच्या स्वप्नांबाबत आणि धाडसाबाबत कौतुकही व्यक्त केलं.

About the Author