मुंबई : मराठी सिनेसृष्टीत सैराट सारख्या सिनेमाची एन्ट्री करत ज्यांनी आपलं नाव आज घराघरात पोहोचवलंय ते नागराज मंजुळे आता लवकरच हिंदी सिनेमा घेऊन येत आहेत. सध्या त्यांच्या आगामी सिनेमामुळे ते खूपच चर्चेत आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सैराटनंतर त्यांनी अनेक सिनेमांचं दिग्दर्शक म्हणून काम सांभाळलं आहे. आणि अभिनय देखील केला आहे. पण आता त्यांचा झुंड हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची महत्त्वाची गोष्ट म्हणजे बिग बी अमिताभ बच्चन नागराज मंजुळे यांच्या सिनेमा भूमिका साकारत आहेत. 


नागराज यांचा हा पहिलाच हिंदी चित्रपट आहे. पण आता हा चित्रपट सोशल मीडियावर खूपच चर्चेत आला आहे. या सिनेमाविषयी काही असे प्रश्न नागराज यांना विचारण्यात येत आहेत. की त्यामुळे त्याची सर्वाधिक चर्चा होत आहे. 


सिनेमा रिलीजसाठी सज्ज असताना नागराज यांनी 'झुंड' हा सिनेमा मराठीत का केला नाही, असे प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केले जात आहेत. 


यावर खुद्द नागाराज यांनी उत्तर दिलं आहे. 'झुंड मराठीत का केला नाही', असा प्रश्न विचारणाऱ्यांना नागराज मंजुळेंनी सडेतोड उत्तर दिलं आहे. "मी म्हणतो पुष्पा मराठीत का झाला नाही", असा प्रतिप्रश्न त्यांनी टीकाकारांना केला. एका मुलाखतीत त्यांनी यावर आपलं मत मांडलं आहे.


सविस्तर वाचा नागराज काय म्हणाले?


" मी म्हणतो ‘पुष्पा’ मराठीत का झाला नाही, किंवा तो तेलुगूतच का बघितला जातोय, हिंदीतच का बघितला जातोय? फेसबुकवर मी पाहतो की, अशा बऱ्याच चर्चा होत असतात. सोशल मीडियावर सेन्सीबल गोष्टींवर चर्चा होत नाही. मला गंमत वाटते की मराठीत केला पाहिजे म्हणतात.


पण मग बच्चन साहेबांनी पण मराठीत चित्रपट केला पाहिजे ना.त्यांनी मराठी शिकून मराठी भाषेत चित्रपट केला पाहिजे.  इतका रुबाब मराठी भाषेचा आणि दिग्दर्शकाचा म्हणजेच माझा असला पाहिजे.


तेवढा वेळसुद्धा देता आला पाहिजे. निर्मात्यांनीही तेवढे पैसे दिले पाहिजेत की बच्चनसाहेब मराठीत चित्रपट करतील," असं ते म्हणाले. हा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित करणाऱ्यांना नागराज यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.