Tirangaa सिनेमाच्या शूटिंगच्या आधी Nana Patekar यांनी ठेवली होती 'ही कठीण' अट

अभिनेता नाना पाटेकर आपल्या चित्रपटांच्या निवडीबाबत खूप कडक आहेत.

Updated: Jun 21, 2021, 02:03 PM IST
Tirangaa सिनेमाच्या शूटिंगच्या आधी Nana Patekar यांनी ठेवली होती 'ही कठीण' अट

मुंबई : बॉलिवूड अभिनेता नाना पाटेकर आपल्या चित्रपटांच्या निवडीबाबत खूप कडक आहेत. नाना पाटेकर आणि राज कुमार 'तिरंगा' या चित्रपटात एकत्र काम करताना दिसले. या दोघांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं आणि बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची कमाई चांगली झाली. जरी नाना पाटेकर यांनी सुरुवातीला या चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. हे थोड्या लोकांनाच माहिती आहे.

सिनेमा नकारण्या मागचं कारण काय होतं?
नाना पाटेकर म्हणाले होते की, आपण व्यावसायिक चित्रपटात काम करत नाही. चित्रपटाचे दिग्दर्शक मेहुल कुमार यांची राज कुमारसोबत नाना पाटेकर या सिनेमात दिसावेत अशी इच्छा होती. यानंतर राज कुमार यांनी नाना पाटेकर यांना याच्या बद्दल सांगितलं आणि चित्रपटाची स्क्रिप्ट एकदा वाचायला सांगितली. स्क्रिप्ट वाचल्यानंतर नाना पाटेकर यांनी चित्रपटाला होकार दिला.

नाना पाटेकर यांनी ठेवली होती अट 
नाना पाटेकर यांनी या चित्रपटासाठी होकार दिला  पण त्याचवेळी एक अट देखील ठेवली होती आणि ती अट अशी होती की, जर राज कुमार यांनी त्यांच्या कामात अडथळा आणला तर नाना पाटेकर त्वरित चित्रपटाचा सेट सोडतील. 

चित्रपटातील दोघांचीही पात्रं एकसारखीच होती. नाना आणि राज कुमार हे देशभक्त असल्याचं या सिनेामांत दाखवण्यात आलं होतं. मात्र काम करण्याच्या आपल्या  वेग-वेगळ्या पद्धतीमुळे या दोघांचही बिलकुल एकमेकांसोबत पटत नव्हतं.

शूटिंग दरम्यान सेटवर झालं होतं भांडण?
नाना पाटेकर यांनी ही अट मेहुलसमोर ठेवली होती. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान या दोघांमध्ये कधीच भांडण किंवा वाद  झाला नव्हता.या मागेही एक मजेदार कारण होतं. खरं तर जेव्हा जेव्हा नाना आणि राज कुमार एकमेकांसमोर असत तेव्हा दोघेही एकमेकांशी बोलत नसत.