Nana Patekar : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांनी त्यांचं करिअर हे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना यापासून वाचवण्यासाठी दिलं. त्या सगळ्या शेतकऱ्यांनी पैशांच्या कर्जा पोटी आत्महत्या केली. तर कोणी शेतात नुकसान झाल्यानं आत्महत्या केली होती. अशा शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींना नाना पाटेकर यांनी आर्थिक मदत देखील केली आहे. नाना पाटेकर यांना शेतकऱ्याचा देव दूत म्हणतात.
जेव्हा केव्हा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली या विषयी बोलतात तेव्हा सगळ्यात आधी कोणत्या राज्याविषयी बोलतात तर तो महाराष्ट्र आहे. शेतकऱ्यांनी हत्या करण्याचं प्रमाण पाहिलं तर महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. NCRB च्या आकडांनुसार, 2022 मध्ये देशात कृषी क्षेत्रा संबंधीत 11290 लोकांनी हत्या केली. त्यात 5207 शेतकरी आणि 6083 शेतात काम करणारे शेतमजुर होते. शेतकऱ्यांच्या परिस्थितीला पाहता नाना पाटेकर यांनी त्यांना मदत करण्यासाठी हात पुढ केला. त्यांनी मराठी अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्यासोबत मिळून 'नाम फाउंडेशन' ची सुरुवात केली.
त्यांच्या या एनजीओच्या अंतर्गत नाना पाटेकर यांनी जवळपास 100 शेतकरी कुटुंबांना 15-15 हजार रुपयांचे चेक वाटले. असं म्हटलं जातं की जगात जो पर्यंत लोकं आहेत. तोपर्यंत माणूसकी राहणार आहे. हे तर नाना पाटेकर आणि मराठवाड्याच राहणारे अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी हे सिद्द केलं. तर 2015 मध्ये जेव्हा महाराष्ट्राच्या मराठवाडा आणि लातूर दुष्काळग्रस्त झाला होता तर शेतकऱ्यांनी आशा सोडली होती.
शेतकरी आत्महत्या करण्यासाठी मजबूर झाले. अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या करणं सोपा पर्याय आहे असं समजलं. हे पाहिल्यानंतर नाना पाटेकर यांना फार वाईट वाटलं. त्यांनी स्वत: ची गाडी खरेदी करण्यासाठी दीड कोटी रुपये खर्च केले. त्यांनी मकरंद अनासपुरे यांच्यासोबत मिळून 15-15 हजार रुपये असे मराठवाडा, लातूर आणि विदर्भातील शेतकऱ्यांना वाटले. तर नाना पाटेकर यांनी सरकारनं शेतकऱ्यांना मदत करण्या आधी ही मदत केली होती.
नाना पाटेकर यांनी जेव्हा शेतकऱ्यांची परिस्थिती जवळून पाहिली तेव्हा त्यांनी त्यांच्यासाठी काही करण्याचा निर्णय घेतला. तेव्हाच त्यांना नाम फाउंडेशनची सुरुवात केली. आता नाना पाटेकर शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी उभे झाले आहेत. तर शेकडो लोकं देखील नाना पाटेकर यांच्यासोबत आहेत. नाना पाटेकर यांनी एका मुलाखतीत सांगितलं की त्यांच्या एनजीओची सुरुवात झाली तर लोकांनी दोन महिन्याच्या आत 60 कोटी रुपये दिले. आता असं झालं आहे की नाना पाटेकर हे मराठवाडा आणि विदर्भात त्यांचा वीकेंड घालवतात. त्यांनी शेतकऱ्यांची मदत हाच त्यांच्या आयुष्यातील एक लक्ष ठरवला आहे. ते त्यांच्या कमाईतीली 90 टक्के भाग हा शेतकऱ्यांसाठी खर्च करतात.