Nawazuddin Siddiqui Maid: बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या (Nawazuddin Siddiqui) मोलकरणीने आता आणखी मोठा खुलासा केला आहे. काही दिवसांपूर्वी नवाजुद्दीन सिद्दीकीच्या मोलकरणीने आपण त्याच्यामुळेच दुबईत अडकलो आहोत असा आरोप केला होता. सपना रॉबिन मसीहने (Sapna Robin Masih) रडतानाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. मात्र त्यानंतर आता तिने आणखी एक व्हिडीओ शेअर केला असून आपण केलेले सर्व आरोप खोटे होते असा खुलासा केला आहे. व्हिसा मिळवण्याच्या खर्चामुळे तिला तिचे वेतन दिले गेले नाही असा आरोप तिने केला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सपनाने एक व्हिडीओ जारी केला असून, आपण केलेले सर्व आरोप खोटे होते असं सांगितलं आहे. आपण दबावाखाली असल्याने आरोप केले होते असं तिचं म्हणणं आहे. "मी तुमचं वाईट इच्छित नाही. तुम्ही खूप चांगले व्यक्ती आहात. यामुळेच मी तुमची माफी मागत आहे," असं सपनाने म्हटलं आहे. 


पुढे तिने सांगितलं आहे की "जो व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिला त्यासाठी मी माफी मागते. जे मीडियात दाखवण्यात आलं, मॅडमनी जे केसमध्ये केलं, जे काही झालं ते सर्व खोटं होतं आणि तुमच्यावर कोणतीही कारवाई होऊ नये अशी माझी इच्छा आहे. तुम्ही फक्त घऱी परत या".


या व्हिडीओवेळी तिने आपण कोणत्याही दबावाखाली नसल्याचं स्पष्ट केलं आहे. "मला माफ करा नवाज सर, मी हात जोडून तुमची माफी मागते," असं सपनाने म्हटलं आहे. 


सपना कोण आहे? 


मिळालेल्या माहितीनुसार, सपना एका संस्थेत सेल्स मॅनेजर म्हणून काम करत होती. दरम्यान, दुबईत नवाजुद्दीनची मुलं शिक्षण घेत असून सपना त्यांची काळजी घेते. 


नवाजुद्दीन आणि पत्नीमध्ये कायदेशीर वाद


नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलिया 2021 मध्ये त्यांच्या दोन मुलांसह दुबईत स्थायिक झाली. आलिया आणि तिची मुले गेल्या वर्षी भारतात परतली आणि यारी रोड येथे एक अपार्टमेंट भाड्याने घेऊन राहू लागली. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची पत्नी आलिया सिद्दीकी यांच्याच मालमत्तेवरून कायदेशीर लढाई सुरु आहे. रिपोर्ट्सनुसार, आलिया तिच्या मुलांसह दुबईहून मुंबईला परतल्यावर दोघांमध्ये वाद सुरु झाले.