नीना गुप्ता यांनी स्वतःच्या ब्रेस्टबद्दल केली अशी कमेंट, लोकांनी कान बंद केले

नीना गुप्ताने एका अभिनेत्रीच्या स्तनावर केलेलं भाष्य सध्या चर्चेचा विषय आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Apr 15, 2025, 07:09 PM IST
नीना गुप्ता यांनी स्वतःच्या ब्रेस्टबद्दल केली अशी कमेंट, लोकांनी कान बंद केले

Neena Gupta on Pamela Anderson : नीना गुप्ताला बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. यासोबतच ती आपल्या बेबाक बोलण्यामुळे देखील चर्चेत असते. नीना गुप्ताने आपल्या करिअरमध्ये बेहतरीन सिनेमे केले आहेत. मात्र आपल्या प्रोफेशनल लाइफपेक्षा ती खासगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. या दरम्यान नीना गुप्ताचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये नीना गुप्ताने एका अभिनेत्रीच्या स्तनावर कमेंट केली आहे. 

काय म्हणाली नीना गुप्ता?

नीना गुप्ताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नीना गुप्ता कपिल शर्माच्या शोमध्ये गेली होती तेव्हा चा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावेळी कपिल शर्माने नीनाला हॉलिवूड सीरिज बेवॉचमध्ये पामेला एंडरसनबाबत एक अशी गोष्ट म्हटली आहे की, जी ऐकल्यानंतर प्रत्येकाने आपल्या कानावर हात ठेवले आहेत. एवढंच नाही तर कपिल शर्माच्या प्रश्नाला नीना गुप्ताने अतिशय परखड पद्धतीने उत्तर दिलं आहे. 

पामेला एंडरसनवर काय बोलली नीना 

कपिल शर्मा शो दरम्यान नीना गुप्ताला विचारण्यात आले होते की, तुमच्याबाबत अशी एक अफवा आहे की, जी हॉलिवूड सीरिज बेवॉच आहे. त्यामध्ये पामेला एंडरसनने साकारलेली भूमिका साकारणार होती. त्यावर नीना गुप्ता यांनी दिलेलं उत्तर सगळ्यांना अवाक करणार आहे. नीना गुप्ताने उत्तर देताना सांगितलं की, माझी छाती तिच्याएवढी मोठी नाही. 

नीनाच्या उत्तराने बंद केले लोकांनी आपले कान

नीना गुप्ताचे हे उत्तर ऐकल्यानंतर तिथे उपस्थित असलेले सर्वजण खूप हसायला लागले. नीना गुप्ताचे हे उत्तर ऐकून काही लोकांनीही कान बंद केले. नंतर, कपिल शर्माने नीना गुप्ता यांनाही सांगितले की हा एक फॅमिली शो आहे आणि म्हणूनच येथे मांसाहारी गप्पा होत नाहीत. तर नीना गुप्ताने कपिलला विचारले की तू मांसाहारी प्रश्न का विचारतोस.