वयस्कर व्यक्ती लफडी...; ट्विंकलचं पुन्हा एक वादग्रस्त विधान! 'कपड्यांपेक्षा अधिक वेगाने...'

New Controversy Twinkle Khanna Comment: आपल्या वादग्रस्त विधानांमुळे मागील काही काळापासून चर्चेत असलेल्या ट्विंकलने पुन्हा एकदा असेच एक विधान केलं असून त्यावरुन मतमतांतरे असल्याचं दिसत आहे. नेमकं ती म्हणालीये का पाहूयात...

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 7, 2025, 04:40 PM IST
 वयस्कर व्यक्ती लफडी...; ट्विंकलचं पुन्हा एक वादग्रस्त विधान! 'कपड्यांपेक्षा अधिक वेगाने...'
कार्यक्रमात केलं विधान (फोटो सौजन्य - अॅमेझॉन प्राइमवरुन साभार)

New Controversy Twinkle Khanna Comment: अभिनेता अक्षय कुमारची पत्नी आणि अभिनेत्री ट्विंकल खन्नाने केलेलं एक विधान चांगलेच चर्चेत आहे. प्रौढांकडून जोडीदाराची फसवणुक होण्यासंदर्भात ट्विंकलने केलेलं विधान सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. काजोलसोबतच्या 'टू मच' या शोमध्ये फसवणुकीसारखी बाब सामान्य असल्यासारखं विधान केल्याबद्दल ट्विंकलला ट्रोलही केलं जात आहे. ट्विंकल या कार्यक्रमात, "वृद्ध लोकांसाठी त्यांचे प्रेमसंबंध लपवणे सोपे आहे. हे लोक जास्त अनुभवी असल्याने त्यांना प्रेमसंबंध लपवणे फायद्याचं ठरतं, असं मला वाटतं," असं विधान केलं आहे. 

Add Zee News as a Preferred Source

वृद्ध लोक प्रेमसंबंध लवण्यात अधिक चांगले

ट्विंकल खन्नाच्या या विधानावर को होस्ट असलेल्या काजोलबरोबरच पाहुण्या आलेल्या अनन्या पांडे आणि फराह खान यांनी प्रतिक्रिया नोंदवल्याचं पाहायला मिळालं. वृद्ध लोक तरुणांपेक्षा त्यांचे प्रेमसंबंध लपवण्यात अधिक चांगले असतात. फराह आणि अनन्या यांनी ट्विंकलच्या या विधानाशी आपण सहमत असल्याचं सांगितलं, तर काजोलने आपल्याला हे पटत नसल्याचं म्हटलं.

वयस्कर लोकांना सराव असतो

"वयाने मोठे लोक यात (प्रेमसंबंध लपवण्यात) खूप माहीर असतात. त्यांना या साऱ्याचा खूप सराव असतो", असं ट्विंकल खन्ना म्हणाली. काजोलने या विधानाशी असहमती दर्शविली. "मला वाटते की तरुण लोक त्यांच्या आयुष्याबद्दल, प्रेमसंबंधांबद्दल सर्वकाही लपवण्यात अधिक उजवे असतात," असं काजोल म्हणाली. मात्र यावर अनन्याने आक्षेप घेतला. सोशल मीडियामुळे, "सर्व काही बाहेर येते", असे मत अनन्याने व्यक्त केले आहे. 

कपड्यांपेक्षा जास्त जोडीदार बदलतात

'आजची मुले कपडे बदलण्यापेक्षा त्यांचे जोडीदार अधिक लवकर बदलतात' या विधानावरुनही चौघींमध्ये चर्चा झाली. ट्विंकल या मताशी सहमत होती. तर फराह, काजोल आणि अनन्या या विधानाशी असहमत होत्या. “ही चांगली गोष्ट आहे कारण आमच्या काळात, ‘लोक काय म्हणतील? आपण हे करू शकत नाही.’ असे होते. आताची तरुणी जोडीदार लवकर बदलतात आणि मला वाटते की ही चांगली गोष्ट आहे,” असं ट्विंकल म्हणाली. “लोक नेहमीच त्यांचे जोडीदार बदलत आले आहेत. पूर्वी, ते थोडे शांतपणे व्हायचे,” असं मत अनन्याने मांडलं. ट्विंकल पुढे म्हणाली, “त्यांच्यासाठी हे खूप सोपे आहे कारण त्यांच्याकडे कोणतेही बॅगेज नाही. ‘या गोष्टी काम करणाऱ्या नाहीत. चला लवकर पुढे जाऊया.’ असं ते म्हणतात.”

रात गई बात गई

यापूर्वी, अशाच एका भागात, ट्विंकल आणि काजोल यांनी भावनिक फसवणूक ही शारीरिक फसवणुकीपेक्षा नातेसंबंधांमधील मोठी मोडतोड करणारी गोष्ट असल्याचे मत व्यक्त केले होते. यासंदर्भात बोलताना, “रात गई बात गई” असं म्हणण्यात आलं होतं. ट्विंकल, काजोल आणि करण जोहर यांचा असा विश्वास होता की शारीरिक फसवणूक ही नात्यांमध्ये करार मोडणारी नाही, तर जान्हवी कपूरने दोन्ही प्रकारांची निंदा केली. ट्विंकल म्हणाली, “ती तरुण आहे. आपण जे काही पाहिले आहे ते तिने पाहिलेले नाही.”

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More