शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा पुन्हा अडचणीत; 60 कोटींच्या फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट समोर

शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा फसवणुकी प्रकरणी एक नवीन अपडेट समोर आली आहे. जाणून घ्या सविस्तर   

सोनेश्वर पाटील | Updated: Nov 6, 2025, 05:40 PM IST
शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा पुन्हा अडचणीत; 60 कोटींच्या फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट समोर

Shilpa Shetty : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या कंपनी ‘बेस्ट डील प्रायव्हेट लिमिटेड’ द्वारे झालेल्या 60 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात आता चौकशीचा वेग वाढवण्यात आला आहे.

Add Zee News as a Preferred Source

आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात कंपनीत काम करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांना समन्स पाठवले आहे. यापैकी एका कर्मचाऱ्याने शाखेसमोर हजेरी लावून जबाब दिला आहे तर उर्वरित तीन जणांची चौकशी अद्याप बाकी आहे.

ईओडब्ल्यूकडून सखोल तपास सुरू

आर्थिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास पथक सध्या या प्रकरणातील काही महत्त्वाच्या बाबींचा शोध घेत आहे. प्राथमिक चौकशीत लक्ष केंद्रित केले आहे की, राज कुंद्राच्या कंपनीकडे खरोखरच ग्राहकांचे इतके ऑर्डर होते का, ज्यासाठी त्यांनी 60 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते? की हा व्यवहार कर बचतीसाठी बनावट गुंतवणूक म्हणून दाखवण्यात आला होता? तसेच चौकशी पथक कंपनीशी संबंधित उत्पादन पुरवठादार आणि जाहिरात देणाऱ्या कंपन्यांचीही विचारपूस करणार आहे. जर या चौकशीत काही संशयास्पद बाबी उघड झाल्या तर शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांची पुन्हा चौकशी होऊ शकते असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

 न्यायालयाकडून गंभीर प्रश्न

आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीदरम्यान कर्मचाऱ्यांकडून कंपनीशी संबंधित अनेक प्रश्न विचारले. त्यात मुख्यतः विचारण्यात आले की, कर्मचाऱ्यांचे वेतन कोणत्या निधीतून दिले जात होते? वेतनासाठी कंपनीच्या कमाईचा वापर केला जात होता का, की पैसा इतर ठिकाणाहून आणला जात होता? 

तसेच कंपनीच्या कार्यालयांच्या फर्निशिंगवर तब्बल 20 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे समोर आले आहे. या खर्चाची सत्यता पडताळण्यासाठी फर्निशिंग करणाऱ्या कंत्राटदार कंपन्यांनाही चौकशीसाठी बोलावले जाणार आहे.

 शिल्पा शेट्टीचा विदेश प्रवासावरून वाद

यापूर्वी शिल्पा शेट्टीने न्यायालयात अर्ज दाखल करून विदेश प्रवासाची परवानगी मागितली होती. मात्र, कोर्टाने हा अर्ज फेटाळत स्पष्ट निर्देश दिले की 'प्रथम फसवणुकीचा पैसा परत द्या, त्यानंतर तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे जा.' या निर्णयामुळे शिल्पा आणि राज कुंद्रा यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.

About the Author

Soneshwar Patil

सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

...Read More