Nitin Desai Death : लोकप्रिय कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी काल त्यांच्या एन.डी.स्टुडिओमध्ये गळफास घेत आत्महत्या केली होती. नितीन यांनी वयाच्या 58 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. नितीन देसाई हे फक्त निर्माता आणि दिग्दर्शक नाही तर अभिनेते देखील होते. आता नितीन देसाई यांच्या या आत्महत्येला एक वेगळं वळण आलं आहे. त्याची माहिती सध्या समोर आली आहे. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी व्हॉईस क्लीप रेकॉर्ड केल्या होत्या अशी माहितमी समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नितीन देसाई यांनी त्यांच्या कर्जतमध्ये असलेल्या एन.डी.स्टुडिओमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. हा त्यांचाच स्टुडिओ होता. काल रात्री अडीचच्या सुमारास ते त्यांच्या या स्टुडिओमध्ये पोहोचले होते. त्यानंतर आत्महत्या करण्यापूर्वी नितीन देसाई यांनी व्हॉईस नोट रेकॉर्ड केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काल रात्री उशिरा ते दिल्लीहून मुंबईला विमानाने आले, त्यानंतर रेकॉर्ड केलेल्या व्हॉईस क्लीपमध्ये त्यांनी काही बिझनेसमनची नावं असल्याचे म्हटले जात आहे. 


हेही वाचा : नितीन देसाईनीं जिथे स्वत: ला संपवलं तो स्टुडिओ बनवण्याचं कारण ठरला होता हॉलिवूड अभिनेता ब्रॅड पीट!


दरम्यान, नितीन देसाई आणि त्यांच्या पत्नीनं एडलवाईस असेट रीकन्स्ट्रक्शन या कंपनीकडून कर्ज घेतलं होतं. मात्र, नितीन आणि त्यांची पत्नी परतफेड करू शकले नाही, त्यामुळे त्यांची मालमत्ता जप्त करण्यासाठी त्यांच्यावर कारवाई सुरु होती. सुत्रांच्या माहितीनुसार, नितीन देसाई यांच्यावर 250 कोटींचं कर्ज होतं. आर्थिक विवंचनेत असल्यामुळे त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जाते. खरंतर हे कर्ज व्याजासहीत होतं. या कर्जाची परत फेड करण्यासाठी नितीन देसाई यांनी त्यांची जमिनी गहाण ठेवली होती. त्याच कारण म्हणजे एडलवाईज कंपनीनं जिल्हाधिकाऱ्यासमोर प्रस्ताव मांडला होता की त्यांच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी त्यांची मालमत्ता जप्त करा. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात एडलवाईज कंपनीने हा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे दिला होता.


नितीन देसाई यांच्या कामाविषयी बोलायचं झालं तर त्यांनी‘लगान’, ‘हम दिल दे छुके सनम’, ‘मिशन काश्मीर’, ‘देवदास’, ‘खाकी’, ‘स्वदेस’ 1942 ए लव्ह स्टोरी, जोधा अकबर सारख्या अनेक चित्रपटांचे सेट बनवले होते.  ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या सिनेमासाठी उत्कृष्ट कला दिग्दर्शक म्हणून ‘महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार’ मिळाला होता. एन. डी . स्टुडिओमध्ये काम करणाऱ्या काही लोकांनी त्यांना या अवस्थेत पाहिल्यानंतर पोलिसांना कळवलं आणि त्यानंतर ही बातमी समोर आली आहे.