Khupte Tithe Gupte: सध्या 'झी मराठी' वाहिनीवर सुरू झालेली 'खुपते तिथे गुप्ते' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. यंदाचे या मालिकेचेही हे तिसरे सिझन आहे. 4 जूनपासून या नव्या पर्वाला सुरूवात झाली आणि पहिल्याच एपिसोडमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती दर्शवली होती. या भागाला प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर अनेक दिग्गज या सिझनमध्ये आपल्याला पाहायला मिळाले आहेत. राज ठाकरे यांच्यानंतर अभिनेता श्रेयस तळपदे, नेते नारायण राणे, खासदार संजय राऊत, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर अशांनी या सिझनमधून हजेरी लावली आहे. त्यामुळे सध्या या शोची चांगलीच चर्चा रंगली आहे. गप्पा, आठवणी, खुपणाऱ्या गोष्टी, मतं, खेळ आणि मनोरंजन यांच्या अनोखा मेळ या मालिकेतून आपल्याला पाहायला मिळतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी खुपते तिथे गुप्तेमधून गप्पा मारायला आले आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. यावेळी त्यांना अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. अनेक आठवणी सांगितल्या त्याचसोबत आपल्याला खुपणाऱ्या गोष्टी आणि ज्यांच्याबद्दल कोणत्या गोष्टी खुपतात त्यांच्याबद्दलही सांगितले. या कार्यक्रमातून त्यांना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते काय म्हणाले या लेखातून जाणून घेऊया. 


हेही वाचा - 'या' बॉलिवूडच्या सौंदर्यवतींचं दिग्दर्शकांच्या प्रेमात पडल्यानंतर करिअर झालं उद्धवस्त, आजही होतोय पाश्चात्ताप


या कार्यक्रमाचे नावं खुपते तिथे गुप्ते असे आहे तेव्हा येणाऱ्या पाहुण्यांना त्यांना खुपणाऱ्या लोकांबद्दल विचारले जाते. तेव्हा यावेळी नितीन गडकरी यांना अवधूत गुप्ते यांनी त्यांना कोणाबद्दल कोणत्या गोष्टी खुपतात याबद्दल विचारले. त्यांच्यासमोर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल विचारण्यात आले. तेव्हा पहिल्यांदा उद्धव ठाकरे यांच्याबद्दल ते म्हणाले की, ह्यांना फोन केल्यानंतर ते फोनवर फार कमी वेळा येतात तर शरद पवार यांच्याबद्दल बोलताना म्हणाले की पवार साहेब स्पष्ट बोलत नाहीत, असं ते म्हणाले. या दोन्ही प्रश्नांवर ते दोघंही हसतात. सध्या रादकीय वातावरण हे वेगळेच तापलेले दिसते आहे. तेव्हा या सर्व काही घडामोडींवर ते भाष्य करणार का? याबद्दलही उत्सुकता कायम आहे. 


पाहा व्हिडीओ 



सध्या या शोला प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांच्या प्रतिसाद मिळतो आहे, त्यामुळे कधी एकदा नवा शो येतो आहे. याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असते. सध्या नितीन गडकरी यावेळी या शोची रंगत वाढवणार आहेत. तेव्हा पाहायला विसरू नका 'खुपते तिथे गुप्ते' रोज रात्री 9 वाजता झी मराठीवर.