'लोकांनी मला बर्बाद करण्याचा प्रयत्न केला', ड्रग स्कँडलच्या आरोपांवर नोराचा खुलासा

Nora Fatehi : बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीने तिच्यावर होत असलेल्या ड्रग स्कैंडल आरोपांवर मौन सोडलं आहे.   

सोनेश्वर पाटील | Updated: Nov 15, 2025, 10:28 PM IST
'लोकांनी मला बर्बाद करण्याचा प्रयत्न केला', ड्रग स्कँडलच्या आरोपांवर नोराचा खुलासा

Nora Fatehi : बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये तिचं नाव अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित ड्रग पार्टी प्रकरणात जोडल्याचा दावा करण्यात आला. हे वृत्त समोर आल्यानंतर सोशल मीडियावर नोराला प्रचंड ट्रोल केलं जात होतं. मात्र यावर अखेर नोराने स्वतःच मौन तोडत कठोर प्रतिक्रिया दिली आहे.

Add Zee News as a Preferred Source

नोरा फतेहीने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक मोठी नोट शेअर करत या चर्चांवर संताप व्यक्त केला. तिने सरळ शब्दांत स्पष्ट केलं की, 'मी पार्ट्यांमध्ये जात नाही, मी सतत काम करत असते. माझं स्वतःचं असं खासगी जीवनही फार नाही. मी स्वतःला अशा लोकांशी जोडत नाही.'

'जर मी सुट्टी घेतली तर मी माझ्या दुबई येथील घरात किंवा माझ्या जवळच्या लोकांसोबत वेळ घालवणं पसंत करते. लोकांना वाटतं की माझं नाव सहज टार्गेट करता येतं. पण आता मी हे पुन्हा होऊ देणार नाही.'

'माझ्यावर कीचड उडवण्याचा प्रयत्न झाला, पण मी शांत राहिले'

आपल्या नोटमध्ये नोराने हेही म्हटलं की, 'लोकांनी मला बर्बाद करण्याचा प्रयत्न केला. अनेक खोट्या गोष्टी केल्या पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. जेव्हा लोक माझ्या नावावर कीचड उडवत होते, तेव्हा मी शांत राहिले. 

पण आता नाही. माझ्या नावाचा आणि फोटोंचा वापर करून अशा प्रकरणात मला ओढू नका, ज्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. हे खूप महागात पडू शकतं.' नोराने स्पष्ट केलं की तिचा कोणत्याही ड्रग पार्टी किंवा अंडरवर्ल्डशी काहीही संबंध नाही. ती पूर्णपणे आपल्या कामावर केंद्रित आहे.

या आगामी चित्रपटात नोरा

नोरा फतेही आपल्या जबरदस्त डान्स मूव्हज आणि हिट आयटम नंबरसाठी प्रसिद्ध आहे. ‘दिलबर’, ‘एक तो कम जिंदगानी’, ‘साकी साकी’ यांसारख्या गाण्यांनी तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली आहे. 

अलीकडेच ती आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदाना यांच्या ‘थामा’ चित्रपटातील ‘दिलबर की आंखों का’ या डान्स नंबरमध्ये दिसली होती. तसेच, चर्चा आहे की नोरा लवकरच दक्षिणेच्या सुपरहिट हॉरर फ्रँचायझी ‘कांचना 4’ मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

FAQ

1. नोरा फतेहीचे नाव कोणत्या प्रकरणात जोडले गेले आहे?

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, नोराचे नाव अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित कथित ड्रग पार्टी प्रकरणात जोडले गेल्याचा दावा करण्यात आला आहे.

2. नोरावर सोशल मीडियावर टीका का झाली?

या आरोपांच्या बातम्या समोर येताच नोराला ट्रोल करण्यात आले आणि तिच्यावर सोशल मीडियात विविध प्रकारच्या टिप्पण्या करण्यात आल्या.

3. नोराने “हे खूप महागात पडू शकतं” या वाक्याचा काय अर्थ?

याचा अर्थ असा की तिचं नाव चुकीच्या प्रकारे वापरणे किंवा तिला नाहक आरोपात ओढणे कायदेशीर किंवा वैयक्तिक स्तरावर गंभीर परिणाम घडवू शकते आणि ती याविरोधात उभे राहणार आहे.

About the Author

Soneshwar Patil

सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

...Read More