)
Amitabh Bachchan : बॉलिवूडचे दोन दिग्गज कलाकार अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे 3 जून 1973 मध्ये विवाहबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाची चर्चा त्या काळी खूप झाली होती. मात्र, पाहुण्यांच्या संख्येने मात्र सर्वांना आश्चर्यचकित केले होते. अलीकडेच अभिनेत्री फरीदा जलाल यांनी दिलेल्या एका मुलाखतीत उघड केले की या लग्नात फिल्म इंडस्ट्रीमधून फक्त दोन लोक उपस्थित होते. ज्यामध्ये त्या स्वतः आणि प्रसिद्ध गीतकार निर्देशक गुलजार.
फरीदा जलाल यांनी जया बच्चनसोबतच्या आपल्या मैत्रीबद्दलही आठवणी सांगितल्या. त्या म्हणाल्या, 'मी पाली हिलमध्ये राहत होते आणि अमितजी जुहूमध्ये. त्यावेळी त्यांची आणि जयाची कोर्टशिप सुरू होती. दोघंही अगदी इतर कपल्सप्रमाणे भांडत, रुसत-फुगत असत. अमितजी स्वतः रात्री गाडी चालवत असत. जया समोर बसायची आणि मी मागे. मी त्यांना चिडवायचे. मला ‘कबाब में हड्डी’ का बनवता?' असं म्हणायचे.
फरीदा यांनी पुढे सांगितले की, त्या लवकर झोपणाऱ्या होत्या. तरीही अमिताभ आणि जया फरीदा यांना रात्री फोन करून त्यांच्या भांडणांच्या गोष्टी सांगायच्या. 'जया रडायची, अमितजी तिला समजवायचे. ते क्षण मला खूप आवडायचे.'
त्या पुढे म्हणाल्या, 'माझी आणि जयाची मैत्री खूप जुनी आहे. मी तिला जिया म्हणायचे. आम्ही कॉफी डेटवरून परतताना चित्रपटांबद्दल बोलायचो. मग ती मला सोडून आपल्या घरी निघून जायची. ती खूप गोड स्वभावाची होती. त्यांच्या लग्नाला त्यांनी मला आणि गुलजार साहेबांना खास बोलावलं होतं. इंडस्ट्रीमधून इतर कोणीही नव्हतं.'
फरीदा जलाल यांनी केवळ पडद्यावर बहिण, आई, आजी अशी असंख्य संस्मरणीय पात्रं साकारली आहेत. त्यांनी फक्त 17 व्या वर्षी ‘तकदीर’ या चित्रपटातून आपला प्रवास सुरू केला होता. त्या वेळी सूरज बडजात्यांचे आजोबा ताराचंद बडजात्या यांनी त्यांना गीता या भूमिकेची संधी दिली होती.
फरीदा यांनी ‘गोपी’ मध्ये दिलीप कुमार यांच्या बहिणीची भूमिका केल्यापासून त्यांचे टाईपकास्टिंग सुरू झाले. नंतर 1990 च्या दशकात त्यांनी ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘कुछ कुछ होता है’, ‘बिच्छू’ सारख्या हिट चित्रपटांमध्ये आईची भूमिका गाजवली.
टेलिव्हिजनवर त्यांनी ‘देख भाई देख’ आणि ‘बालिका वधू’ सारख्या मालिकांमध्ये काम केले. अलीकडेच त्या संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी: द डायमंड बाजार’ या ओटीटी प्रकल्पात कुदसिया बेगमच्या भूमिकेत दिसल्या आहेत.
FAQ
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचे लग्न कधी झाले?
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचे लग्न ३ जून १९७३ रोजी झाले. त्या काळी त्यांच्या लग्नाची चर्चा खूप झाली होती, पण पाहुण्यांच्या संख्येने सर्वांना आश्चर्यचकित केले होते.
लग्नात फिल्म इंडस्ट्रीमधून कोण उपस्थित होते?
लग्नात फिल्म इंडस्ट्रीमधून फक्त दोन लोक उपस्थित होते: फरीदा जलाल आणि गीतकार-निर्देशक गुलजार. फरीदा जलाल यांनी मुलाखतीत सांगितले की, जया बच्चन यांनी त्यांना आणि गुलजारांना खास बोलावले होते.
फरीदा जलाल आणि जया बच्चन यांची मैत्री कशी सुरू झाली?
फरीदा जलाल आणि जया बच्चन यांची मैत्री खूप जुनी आहे. फरीदा पाली हिलमध्ये राहत होत्या आणि जया जुहूमध्ये. अमिताभ आणि जयाची कोर्टशिप सुरू असताना दोघी कॉफी डेट्सवर जायच्या आणि चित्रपटांबद्दल बोलायच्या. फरीदा जयाला ‘जिया’ म्हणायच्या.