अनेक बॉलिवूड कलाकार देव दर्शनाला जातात. बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला ऑरी देखील असाच वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेला होता. ऑरी म्हणजे ओरहान अवात्रामणिने त्या ठिकाणी चुकीचा प्रकार केल्यामुळे अक्षरशः त्याला अटक करण्याची वेळ आली होती. रियासी जिल्ह्याचे एसपी स्पष्ट सांगितले की, 'बॉलिवूड स्टारला अरेस्ट केलं जाऊ शकतं.' हे सर्व ऑरीच्या इंस्टाग्राम पोस्टनंतर घडले. ओरीने कटरा येथील एका हॉटेलमध्ये दारू पितानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता, त्यानंतर त्याच्याविरुद्ध कटरा पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. त्याच्यासोबत आणखी आठ जणांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऑरी अनेकदा मोठ्या बॉलिवूड स्टार्ससोबतच्या फोटोंमध्ये दिसतो. तो एक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. 15मार्च रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये ऑरी त्याच्या काही मित्रांसोबत एका खाजगी हॉटेलमध्ये पार्टी करताना दिसत होता. ज्यामध्ये टेबलावर दारू ठेवलेली दिसते. कटरा येथे दारू आणि मांसाच्या सेवन आणि विक्रीवर पूर्ण बंदी आहे. माता वैष्णोदेवी मंदिरात दारू आणि मांसाहार पूर्णपणे निषिद्ध असल्याने कॉटेज सूटमध्ये दारू आणि मांसाहार करण्यास परवानगी नाही हे त्यांना सांगण्यात आले होते, तरीही ऑरीने हॉटेलच्या आवारात दारू प्यायल्याचा आरोप आहे.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, एसएसपी रियासी परमवीर सिंह यांनी आरोपींना अटक करण्याचे कडक निर्देश दिले. धार्मिक स्थळांवर ड्रग्ज किंवा मद्यपानाचे असे कोणतेही कृत्य खपवून घेतले जाणार नाही, असे सांगण्यात आले. ऑरी सोबत जम्मूतील एका प्रसिद्ध रेस्टॉरंटचे मालक आणि एक महिला तहसीलदार देखील उपस्थित होत्या. त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Jammu & Kashmir | As per police, FIR was registered against eight people, including socialite influencer Orhan Awatramani aka Orry, for allegedly consuming alcohol in a hotel located in Katra
— ANI (@ANI) March 17, 2025
पोलिसांनी सांगितले की, कटरा येथील एका हॉटेलमध्ये थांबलेल्या काही पाहुण्यांनी दारू पिल्याच्या तक्रारीची दखल घेत, कटरा पोलिस ठाण्यात 15 मार्च रोजी एफआयआर क्रमांक 72/25 नोंदवण्यात आला, ज्यामध्ये ओरहान अवत्रामणी, दर्शन सिंग, पार्थ रैना, हृतिक सिंग, राशी दत्ता, रक्षिता भोगल, शगुन कोहली आणि अनास्तासिला अरझमस्किना यांचा समावेश आहे. कॉटेज सूटमध्ये दारू आणि मांसाहार करण्यास मनाई आहे हे त्यांना सांगण्यात आले होते, तरीही त्यांनी हॉटेलच्या आवारात दारू प्यायली. अशा दिव्य माता वैष्णोदेवी मंदिरात हे सक्त मनाई आहे.
देशाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि श्रद्धाळू लोकांच्या भावनांचा अनादर करणाऱ्या गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस अधीक्षक कटरा, एसडीपीओ कटरा आणि एसएचओ कटरा यांच्या देखरेखीखाली ही टीम तयार करण्यात आली होती. एसएसपी रियासी यांनी गुन्हेगारांना कडक संदेश देत म्हटले की, देशाच्या कायद्याचे पालन न करणाऱ्या आणि कोणत्याही प्रकारे शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना, विशेषतः ड्रग्ज आणि अल्कोहोलचा अवलंब करणाऱ्यांना येथे स्थान नाही आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.