India’s Official Entries for Oscars 2026 Nomination: ऑस्कर! असा एक पुरस्कार जो मनोरंजन क्षेत्रातील प्रत्येकाल कधी तरी आपल्याला मिळावा असं वाटते. पण त्यासाठीची स्पर्धा फारच मोठी असते. ही आंतरराष्ट्रीय स्थरावरील स्पर्धा असते. यंदा, 2026 च्या सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्काराच्या शर्यतीत चार भारतीय चित्रपटांचा समावेश झाला आहे. यामध्ये कन्नड सुपरहिट चित्रपट ‘कांतारा: अ लेजेंड – चॅप्टर 1’ आणि अनुपम खेर दिग्दर्शित हिंदी चित्रपट ‘तन्वी द ग्रेट’ यांचा समावेश आहे. तर मराठीमध्ये बॉक्स ऑफिस तुफान कमाई केलेला 'दशावतार' हा सिनेमाही आहे. ही माहिती अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसकडून देण्यात आली आहे. यंदा या श्रेणीत एकूण 201 चित्रपटांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे.
अकॅडमीने गुरुवारी 98व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी पात्र ठरलेल्या चित्रपटांची प्राथमिक यादी जाहीर केली. ही यादी अंतिम नामांकन जाहीर होण्याआधीची प्रक्रिया असून, नामांकनांची घोषणा 22 जानेवारी रोजी केली जाणार आहे.
अकॅडमीच्या माहितीनुसार, यंदा एकूण 317 फिचर चित्रपट ऑस्कर पुरस्कारांसाठी पात्र ठरले आहेत. यापैकी 201 चित्रपटांनी सर्वोत्कृष्ट चित्रपट श्रेणीसाठी आवश्यक अतिरिक्त निकष पूर्ण केले आहेत.
ऋषभ शेट्टी अभिनीत ‘कांतारा: चॅप्टर 1’ आणि ‘तन्वी द ग्रेट’ व्यतिरिक्त या यादीत इतर भारतीय चित्रपटांचाही समावेश आहे. यामध्ये बहुभाषिक अॅनिमेटेड चित्रपट ‘महावतार नरसिंह’ आणि अभिशान जीविंथ दिग्दर्शित तमिळ चित्रपट ‘टुरिस्ट फॅमिली’ यांचा समावेश आहे.
याशिवाय, भारत आणि ब्रिटनच्या सहनिर्मितीत तयार झालेला, राधिका आपटे अभिनीत हिंदी चित्रपट **‘सिस्टर मिडनाइट’**लाही या यादीत स्थान मिळाले आहे. ऑस्करच्या विविध श्रेणींसाठी पात्र ठरलेल्या चित्रपटांच्या सामान्य प्रवेश यादीत आणखी अनेक भारतीय तसेच भारतीय सहनिर्मित चित्रपटांचा समावेश आहे.
यामध्ये नीरज घायवान यांचा ‘होमबाउंड’ हा चित्रपटही आहे, जो सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फिचर फिल्म श्रेणीसाठी भारताची अधिकृत एन्ट्री आहे. तसेच ‘दशावतार’ (मराठी), ‘गेवी’ (तमिळ), इंडी फिल्म ‘ह्युमन्स इन द लूप’, माहितीपट ‘महामंत्र – द ग्रेट चँट’, भारत-पापुआ न्यू गिनी सहनिर्मित ‘पापा बुका’, ‘पेपर फ्लावर्स’ आणि ‘पारो: द अनटोल्ड स्टोरी ऑफ ब्राइड स्लेवरी’ हे चित्रपटही या यादीत आहेत.
मात्र, प्राथमिक यादीत स्थान मिळणे म्हणजे थेट नामांकन मिळेलच असे नाही. पुढील टप्प्यात या सर्व चित्रपटांना अकॅडमीच्या मतदान प्रक्रियेतून जावे लागणार आहे.
सामान्य श्रेणीत पात्र ठरण्यासाठी चित्रपटांचे 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत अमेरिकेतील सहा प्रमुख महानगरीय भागांपैकी (लॉस एंजेलिस काउंटी, न्यूयॉर्क सिटी, बे एरिया, शिकागो, डलास-फोर्ट वर्थ आणि अटलांटा) किमान एका ठिकाणी चित्रपटगृहात प्रदर्शन आवश्यक आहे. तसेच, तो चित्रपट सात दिवस सलग त्या थिएटरमध्ये दाखवला जाणे बंधनकारक आहे.
यंदा 15 मार्च रोजी होणाऱ्या ऑस्कर सोहळ्यात 24 श्रेणींमध्ये पुरस्कार दिले जाणार आहेत. सर्वोत्कृष्ट चित्रपट श्रेणीत 10 नामांकन, तर इतर सर्व श्रेणींमध्ये 5 नामांकन असतील.
तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे. 'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.