'तो बारीक म्हातारा'; वजनावरून करण जोहरची खिल्ली उडवणं पाकिस्तानी अ‍ॅंकरला महागात, नेटकऱ्यांकडून बेक्कार ट्रोल

Pakistani Anchor Make Fun of Karan Johar : पाकिस्तानी अभिनेत्रीनं करण जोहरच्या ट्रॉन्फॉर्मेशनची उडवली खिल्ली... 

दिक्षा पाटील | Updated: Apr 25, 2025, 02:34 PM IST
'तो बारीक म्हातारा'; वजनावरून करण जोहरची खिल्ली उडवणं पाकिस्तानी अ‍ॅंकरला महागात, नेटकऱ्यांकडून बेक्कार ट्रोल
(Photo Credit : Social Media)

Pakistani Anchor Make Fun of Karan Johar : बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर हा गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या ट्रान्सफॉरमेशनमुळे चर्चेत आहे. त्यानं केलेलं ट्रान्सफॉर्मेशन पाहून सगळ्यांना आश्चर्य झालं. इतकंच नाही तर त्याची ही ट्रान्सफॉर्मेशन पाहून सगळीकडे त्यानं असं का केलं आणि तो आता कसा दिसतोय या सगळ्या गोष्टींवर चर्चा झाली. प्रत्येकाला जाणून घ्यायचं आहे की त्यानं इतकं वजन इतक्या सहजतेनं कसं कमी केलं. अनेकांनी असं म्हटलं की करणनं वजन कमी करण्यासाठी ओजेम्पिक सारख्या औषधांचा वापर केला. आता त्यानं अचानक वजन कमी करण्यावरून टीव्ही होस्ट निदा यासिरनं देखील प्रश्न उपस्थित केले आहेत. 

सोशल मीडियावर निदाच्या मॉर्निंग शोची एक क्लिप व्हायरल होते. ज्यात करण जोहरच्या चेहऱ्यावरून ती त्याची खिल्ली उडवताना दिसते. तिनं म्हटलं की करण जोहरनं ओजेम्पिकनंतरचा चेहरा असं म्हटलं. निदा म्हणाली, 'बारीक म्हातारा... करण जोहरचा ओजेम्पिकनंतरचा चेहरा. आजकाल आपण पाहतोय की तो इतका बारीक झालाय की सगळे त्याला म्हणतायत ओजेम्पिक चेहरा.' तिच्यासोबत बसलेली महिला देखील बोलताना दिसते की तो आता चांगला दिसत नाहीये. असं वाटतंय की त्यानं काहीतरी गमावलं आहे. 

दरम्यान, निदानं केलेलं वक्तव्य कोणाला आवडलेलं नाही. भारतशिवाय पाकिस्तानच्या लोकांना देखील या गोष्टी आवडलेल्या नाही. त्यांनी निदाला करण जोहरवर थेट कमेंट करण्यावरून ट्रोल केलं आहे. त्यासोबत निदानं स्वत: बोटॉक्स केलेत यावरून चांगलंच ट्रोल केलं आहे. एका नेटकऱ्यानं म्हटलं की 'कोणाला बारीक आणि ओजेम्पिक चेहऱ्याचा म्हणणं आणि त्यावर करण जोहरचं थेट नावं घेणं हे चुकीचं आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'ही बाई स्वत: चेहऱ्यावर इतकं बोटॉक्स करते आणि दुसऱ्याच्या त्याच्या दिसण्यावरून बोलते. याला म्हणतात डबल स्टॅन्डर्ड्स.' 

हेही वाचा : 'दहशतवाद्यांचा इस्लाम आमचा इस्लाम नाही'; धर्माची संकल्पना स्पष्ट करत शाहरुख खान म्हणाला...

आता करण जोहरच्या प्रोजेक्टविषयी बोलायचं झालं तर त्याचा 'केसरी चॅप्टर 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तर त्याचा या चित्रपटानं अजूनही बॉक्स ऑफिसवर 50 कोटींचा आकडा पार केलेला नाही.