पलाश मुच्छलने 40 लाख रुपयांच्या फसवणुकीवर केली प्रतिक्रिया त्यातचं आता बहीण पलकने शेअर केला व्हिडिओ

Palak Muchhal shares video : 40 लाख रुपयांच्या फसवणुकीच्या आरोपात संगीतकार पलाश मुच्छल अडकला आहे. या आरोपांवर पलाश कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच दरम्यान, बहीण पलकने सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडिओ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.  

कावेरी पिंपळे | Updated: Jan 24, 2026, 11:36 AM IST
पलाश मुच्छलने 40 लाख रुपयांच्या फसवणुकीवर केली प्रतिक्रिया त्यातचं आता बहीण पलकने शेअर केला व्हिडिओ

गायिका पलाश मुच्छल सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सांगलीतील विज्ञान माने यांनी आरोप केला आहे की, क्रिकेटपटू स्मृती मानधना यांचे वडील पलाश याच्याशी ओळख करून दिल्याचे सांगितले. माने यांच्या दाव्यानुसार, पलाशने 40 लाख रुपयांची फसवणूक केली असून, त्याने मोठा परतावा देण्यास नकार दिला आहे.

Add Zee News as a Preferred Source

या प्रकरणामुळे सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली असून, नेटकऱ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. याप्रकरणात पलाशने कायदेशीर उत्तर देण्याचा निर्णय घेतला असून, त्याने सर्व आरोप फेटाळले आहेत.

पलक मुच्छलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

पलाशच्या बहीण आणि गायिका पलक मुच्छलने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या व्हिडिओमध्ये पलकने वसंत पंचमीच्या निमित्ताने एक सुंदर गाणे सादर केले आहे आणि सरस्वती पूजनासाठीचा मंत्रही लिहिला आहे. तिच्या गोड गळ्यामुळे हे गाणे प्रेक्षकांच्या मनावर घर करून गेले आहे. पलकने या पोस्टसाठी कॅप्शनमध्ये लिहिले आहे: “वसंत पंचमी आणि सरस्वती पूजनाच्या शुभेच्छा”. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी तिच्या गायनाचे भरभरून कौतुक केले असून, व्हिडिओवर अनेक सकारात्मक कमेंट्स आल्या आहेत.

पलाशने काय खुलासा केला?

पलाश मुच्छलने सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट लिहून स्वतःच्या बाजू स्पष्ट केली आहे. त्याने म्हटले आहे: 'सांगलीतील विज्ञान माने यांनी माझ्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून जे आरोप केले आहेत, ते पूर्णपणे खोटे आणि तथ्यहीन आहेत. हे आरोप माझी छबी खराब करण्यासाठी करण्यात आले आहेत. माझे वकील श्रेयांश मिथारे सर्व कायदेशीर मार्ग शोधत आहेत आणि योग्य कायदेशीर प्रक्रियेद्वारे त्यांना उत्तर दिले जाईल.'

पलाशने स्पष्ट केले की, तो या आरोपांकडे दुर्लक्ष करणार नाही, पण योग्य कायदेशीर मार्गानेच त्यांना प्रत्युत्तर दिले जाईल.

फसवणुकीसह गंभीर आरोप

सांगलीतील 34 वर्षीय विज्ञान माने यांनी स्थानिक पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. माने यांच्या दाव्यानुसार, पलाशने चित्रपटात अभिनयाची संधी देण्याचे आमिष दाखवून 40 लाख रुपये घेतले आणि ते परत करण्यास नकार दिला. यासोबतच, माने यांनी खळबळजनक दावा केला आहे की, स्मृती मानधना आणि पलाश यांचे लग्न सुरू असताना 23 नोव्हेंबर 2025 रोजी पलाश दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडला गेला, आणि या प्रकरणामुळे सर्व महिला क्रिकेटपटूंनी त्याला तणाव दिला. माने यांच्या म्हणण्यानुसार, पलाश स्मृतीचा बालमित्र असूनही असे वर्तन केले.

सोशल मीडिया प्रतिक्रिया

या प्रकरणामुळे सोशल मीडियावर वादविवाद सुरू झाला आहे. काही नेटकऱ्यांनी पलाशवर टीका केली आहे, तर काहींनी विद्यान मानेच्या आरोपांवर शंका व्यक्त केली आहे. याच दरम्यान, पलक मुच्छलचा व्हिडिओ आणि तिचे गोड गायन लोकांच्या पसंतीस उतरले आहे आणि प्रेक्षकांनी तिच्या गाण्याचे भरभरून कौतुक केले आहे.

कायदेशीर पुढील टप्पे

पलाश मुच्छल या प्रकरणी कायदेशीर पर्यायांचा विचार करत आहे. विद्यान माने यांनी केलेली तक्रार स्थानिक पोलिसांत दाखल झाली असून, याविषयी कायदेशीर कारवाई पुढील काही दिवसांत कशी होईल, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ताज्या घडामोडींवर चाहत्यांचे लक्ष आहे आणि सोशल मीडियावर या प्रकरणाची चर्चा सुरु आहे.

About the Author

kaveri pimpley

कावेरी पिंपळे सध्या ‘झी २४ तास डिजिटल’मध्ये कंटेंट एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना पत्रकारितेचा चार वर्षांचा अनुभव आहे.

...Read More