बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन नेहमीच कोणत्याना कोणत्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. त्या अनेकदा वाद निर्माण करणारी विधाने करतात त्यात आता त्यांच्या विधानाचा नातू अगस्त नंदाच्या चित्रपटावर परिणाम होणार असे सांगितले जात आहे. जया बच्चन यांना पापाराझी संस्कृती आवडत नाही आणि त्यांनी अनेक प्रसंगी नाराजी व्यक्त केली आहे. अलीकडेच त्यांनी एका फोटो जर्नलिस्टच्या कपड्यांवर खोचक विधान केले. त्यानंतर, पापाराझी खूप मोठा निर्यण घेत असल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये त्यांचा नातू अगस्त्य नंदाच्या चित्रपटावर टांगती तरलावर असल्याचं चित्र आहे.
अलीकडेच बरखा दत्तला दिलेल्या एका खास मुलाखतीत, जया बच्चन यांनी पापाराझींवरील त्यांच्या मतांबद्दल चर्चा केली. या मुलाखती दरम्यान त्यांनी पापारांझींना खूप सुनावलं एवढेच नाही तर त्या म्हणाल्या "प्रशिक्षणाशिवाय, ते विचित्र ठिकाणी आमचे चित्रीकरण सुरू करतात, ज्यामुळे मी नाखूष होते. माझ्या वडिलांचे उदाहरण घ्या, ते एक आदरणीय पत्रकार होते आणि स्वतः मीडियाचा भाग असूनही, या घाणेरड्या लोकांपेक्षा खूप वेगळे होते."
नेमकं काय म्हणाल्या जया बच्चन?
जया यांनी त्यांच्या शिक्षण आणि पार्श्वभूमीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्या म्हणाल्या, "पण हे लोक बाहेर आहेत, ड्रेनपाइपने घट्ट, घाणेरडे पँट घालतात आणि मोबाईल फोन बाळगतात... त्यांना वाटते की त्यांच्याकडे मोबाईल फोन असल्याने ते तुमचा फोटो काढू शकतात आणि त्यांना वाटेल ते बोलू शकतात. आणि ते ज्या प्रकारच्या कमेंट करतात त्यावरून कळते की हे कोणत्या प्रकारचे लोक आहेत? कुठून येतात काय माहित असले लोक?"
पापाराझी रागावले
जया बच्चन यांच्या या विधानामुळे पापाराझी संतापले आहेत. नामांकित पापाराझी वरिंदर चावला म्हणाला, "जेव्हा अमिताभ बच्चन हे एका चाहत्यावर ओरडले तेव्हा त्या स्टारच्या आदरापोटी आणि त्यांच्या पीआर टीमच्या विनंतीवरून पापाराझींनी ही घटना मीडियावर शेअर केली नाही. त्यांनी इतर पापाराझी टीमना त्यांच्या कुटुंबाला कव्हर करणे थांबवण्याचा सल्ला दिला, पण, त्यांना हे माहित असले पाहिजे की त्यांचे फोटो काढणारे सर्व पापाराझीच आहेत किंवा मीडिया पर्सन आहेत असे नाही, त्यात युट्यूबर्स आणि चाहते देखील आहेत? असे कोणाबद्दलही वाईट बोलू नका. मी माझ्या सहकाऱ्यांना सांगितले की "आम्हाला स्वाभिमान आमच्या कामाचा आहे आणि आम्ही त्यांच्यावर बहिष्कार टाकतो."
हे ही वाचा: लग्नानंतर अवघ्या 4 दिवसांतच समांथा घराबाहेर; सेटवरील फोटोची सगळीकडेच चर्चा
तुम्ही 'इक्कीस'ला प्रमोट करणार नाही का ?
अलीकडेच माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत, लोकप्रिय पापाराझी पल्लव पालीवाल म्हणाला , " तिने जे म्हटले ते दुःखद आहे. तिचा नातू अगस्त्यचा 'इक्कीस' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. जर पापाराझीच प्रमोशनसाठी आले नाहीत तर काय होईल? दिवसरात्र अथक परिश्रम करणाऱ्या लोकांसाठी, त्यांच्या लूकवरून एखाद्याला जज करणे हे लाजिरवाणे आहे." त्याने पापाराझी या पिढीचे सर्वात वेगवान माध्यम असल्याचे अधोरेखित केले आणि विचारले की ते पापाराझींच्या मदतीशिवाय 'इक्कीस' चित्रपटाचे प्रमोशन करू शकते का? "
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.