मुंबई : अनेक मराठी तारकांप्रमाणे आता प्रार्थना बेहेरे रेशीम गाठीत अडकणार असल्याची गुडन्यूज आहे. अभिनेत्री प्रार्थना बेहेरे बोहल्यावर चढणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिने आपली लगीनगाठ एका मॅरेज ब्युरोच्या मदतीने मारली आहे. याबाबत तिनेच ही माहिती दिली. प्रार्थनाचा जोडदार हा अभिषेक असणार आहे. त्याच्या आवडी निवडी आणि अनेक गोष्टी खूप कॉमन असल्यामुळे तो चांगला जोडीदार ठरु शकतो, त्यामुळे अभिषेकला पसंत केल्याचे प्रार्थनाने म्हटलेय.



दिग्दर्शक अभिषेक जावकर याच्यासोबत ती १४ नोव्हेंबर २०१७ ती लग्नबंधनात अडकणार आहे. ऑगस्टमध्ये प्रार्थना साखरपुडा करणार आहे. सध्या दोघेही लग्नाच्या तयारीला लागले आहेत.



प्रार्थनाने आधी 'पवित्र रिश्ता' मालिकेतून छोटा पडदा गाजवला. त्यानंतर 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा' या मराठी सिनेमातून एंट्री मारत रसिकांची मनं जिंकली. यानंतर 'मितवा', 'कॉफी आणि बरंच काही', 'मिस्टर अॅंड मिसेस सदाचारी' या सिनेमातून तिच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली. 


कोण आहे तिचा जोडीदार