'माझा पती दुसऱ्या मुलीसोबत हॉटेलात गेला अन्...', सुपरस्टारच्या पत्नीने Instagram Live करुन केला भांडाफोड, VIDEO व्हायरल

Wife Allegations on Pawan Singh: भोजपुरी स्टार आणि राजकारणी पवन सिंहची पत्नी ज्योती सिंगने त्याच्यावर व्यभिचार आणि छळाचे गंभीर आरोप केल्यानंतर सोशल मीडियावर टीकेचा सामना करावा लागत आहे.   

शिवराज यादव | Updated: Oct 6, 2025, 07:16 PM IST
'माझा पती दुसऱ्या मुलीसोबत हॉटेलात गेला अन्...', सुपरस्टारच्या पत्नीने Instagram Live करुन केला भांडाफोड, VIDEO व्हायरल

Wife Allegations on Pawan Singh: भोजपुरी पॉवर स्टार पवन सिंह आणि त्याची पत्नी ज्योती सिंह यांच्यातील वाद आता वाढत चालल्याचं दिसत आहे. रविवारी पतीला भेटण्यासाठी लखनऊमधील घरी पोहोचलेल्या ज्योती सिंहला घेऊन जाण्यासाठी पोलीस आधीच दाखल झाले होते. यानंत ज्योती सिंहने इंस्टाग्रामला लाईव्ह करत एक व्हिडीओ बनवला, ज्यामध्ये ती धायमोकलून रडताना दिसत आहे. व्हिडीओत ज्योती सांगते की, नमस्कार मी ज्योती सिंह आणि मी पवन सिंहच्या लखनऊमधील घरी पोहोचली आहे. पवनने माझ्याविरोधात पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला. मला घेऊन जाण्यासाठी पोलीस पोहोचले आहेत. 

Add Zee News as a Preferred Source

ज्योतीने यावेळी लोकांना आवाहन करत मी तुम्हा लोकांच्या सांगण्यावर येथे आली असं सांगितलं. तुम्ही म्हटलं होतं की, भाभी तुम्ही या, तुम्हाला घरातून कोण काढतं हे आम्ही पाहतो? आता तुम्हीच निर्णय करा की मला न्याय कसा मिळणार. तुम्ही लोक जनता आहात, आता तुम्हीच न्याय करा. 

यादरम्यान ज्योती सिंह पोलिसांना मला कोणत्या प्रकरणात नेत आहात असं विचारताना दिसत आहे. पोलीस यावेळी तिला समजावतात आणि सांगतात. यानंतर ज्योतीसोबत असमारी एक महिला तिला मोबाईल देते. या मोबाईलवरुन ज्योत सिंग दुसऱ्या बाजूला असणाऱ्या वकिलाशी बोलते. ज्योती सिंग तिच्या वकिलाशी फोनवर बोलताना रडत रडत म्हणते की, "मी माझ्या पतीच्या घरी आले आणि या कारणास्तव माझ्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे."

तिने इंस्टाग्राम लाईव्ह दरम्यान सांगितलं की, “हा पवन सिंग समाजाची सेवा करणार आहे, जो त्याच्या पत्नीला बाहेर काढण्यासाठी पोलिसांना बोलावतो. जेव्हा निवडणूक होती तेव्हा त्याने मला फोन केला आणि माझे नाव वापरले. त्यानंतर तो दुसऱ्या मुलीसोबत हॉटेलमध्ये गेला. सर्वजण विचारायचे की मी माझ्या घरी का आले, पवनजी आमच्यासमोर एका मुलीसोबत हॉटेलमध्ये का गेले नाही. पत्नी असल्याने, माझ्या पतीला दुसऱ्या मुलीसोबत पाहणे मला सहन होत नव्हते, म्हणून मी निघून गेले. तुम्ही तुमच्या बहिणी आणि मुलीसोबत कधी असाल तेव्हा हे तुम्हाला कळेल”.

कोर्टात सुरु आहे घटस्फोटाची केस

भोजपुरी अभिनेता पवन सिंह आणि त्याची पत्नी ज्योती सिंह यांच्यातील घटस्फोटाचा खटला न्यायालयात सुरू असल्याची माहिती आहे. ज्योती नियमितपणे सोशल मीडियावर तिचा पती पवनबद्दल भावनिक पोस्ट शेअर करत असते. गेल्या शुक्रवारी तिने सोशल मीडियावर पवन सिंह आणि त्याच्या कुटुंबाला भेटण्यासाठी लखनऊला येत असल्याचं पोस्ट केलं होतं. 

तिने असंही म्हटलं की ती दोन दिवस वाट पाहणार आहे, कारण एक महत्त्वाचा निर्णय घ्यायचा होता. ज्योतीने लिहिले, "प्रिय पती, श्री. पवन सिंह, मी उद्या लखनौ येथील तुमच्या निवासस्थानी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला भेटण्यासाठी येत आहे. मला आशा आहेच, पण पूर्ण विश्वास आहे की तुम्ही मला नक्कीच भेटाल".

जर तुम्ही दुसरीकडे कुठे असाल तर मी दोन दिवस तुमची वाट पाहीन. किंवा तुम्ही मला जिथे बोलावाल तिथे मी जाईन. तुमच्यासोबत चर्चा करण्यासाठी अनेक गोष्टी आहेत आणि अनेक महत्त्वाचे निर्णय घ्यायचे आहेत. म्हणून, मी नम्रपणे विनंती करते की तुम्ही कृपया मला भेटा." - तुमची पत्नी, ज्योती

तिच्या पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये तिला पाठिंबा मिळत आहे. एका सोशल मीडिया युजरने लिहिले, “पवन, तू तुझ्या पत्नीशी कसा वागतोयस याची तुला लाज वाटली पाहिजे, हे खूप चुकीचे आहे भाऊ”. दुसऱ्या युजरने लिहिले, “मला वाटलं होते की आज सर्व काही ठीक होईल आणि दोघेही एकत्र असतील पण असे दृश्य पाहून मला खूप वाईट वाटते”.

तिसऱ्या युजरने लिहिले, “आम्हाला कधीच वाटलं नव्हतं की पवन सिंग इतका खालच्या स्तरावर जाईल. ज्योती सिंगसोबत खूप चुकीचं झालं”. पवन सिंगच्या अलीकडील इंस्टाग्राम पोस्टवरही नेटकऱ्यांनी त्याच्या वागण्याबद्दल टीका केली. एका युजरने लिहिले, “पवन, तू तुझ्या मुलीशी असे करत आहेस, आम्हाला लाज वाटते की आम्ही तुझे चाहते आहोत”.

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More