)
Ram Charan Bodyguard Video : अभिनेता राम चरण आणि अभिनेत्री जान्हवी कपूर यांच्या आगामी 'पेड्डी' चित्रपटाच्या प्रमोशनात व्यस्त आहेत. मागील काही दिवसांपासून 'पेड्डी' चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे, आता विजयवाडा येथे प्रमोशनाच्या दरम्यान एक धक्कादायक घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. मंचावर चित्रपटाचे प्रमोशन करत असताना, राम चरणसारखा दिसणारा एक चाहता अचानक त्यांच्या दिशेने धावत आला. यावेळी अभिनेत्री समोर बसलेली होती आणि जेव्हा तो चाहता राम चरणच्या दिशेने आला तेव्हा जान्हवी कपूरच्या तोंडावर भिती पाहायला मिळाली.
राम चरण आणि जान्हवी कपूर हे दोघे शेजारी बसलेले होते, यावेळी प्रमोशन सुरु होते. जेव्हा तो चाहता राम चरण याच्याकडे धावला तेव्हा राम चरणचा वैयक्तिक बॅाडीगार्ड आणि एमएमए फायटर केविन कुंटाने यावेळी लगेचच धाव घेतली आणि त्या चाहत्याला थांबवले आणि आणि स्टेजवरून खाली नेले. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. राम चरण याला भेटायला आलेला राम चरणचा चाहता हा अभिनेत्यासारखाच दिसत आहे. व्हिडिओमध्ये असलेला राम चरणचा बॅाडीगार्ड हा मागील काही दिवसांमध्ये फारच व्हायरल झाला आहे.
अचानक हा चाहता राम चरण आणि जान्हवीच्या दिशेने आल्यामुळे अभिनेत्री फारच खाबरली. पण तेथे सुरक्षा असल्यामुळे राम चरणचा वैयक्तिक बॅाडीगार्ड केविन कुंटा मधे आला. राम चरणचा वैयक्तिक बॅाडीगार्ड आणि एमएमए फायटर असलेल्या केविनने तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली आणि त्या चाहत्याला उचलून मंचावरून खाली लगेचच नेण्यात आले. आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बॅाडीगार्डचे सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे. त्याची चपळाईचे आणि त्याच्या ताकदीचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे, ज्यामुळे परिस्थिती चिघळण्यापासून वाचली.
RAM CHARAN FAN MOMENT CONVERTED INTO CHAOS
— Jeet (@JeetN25) June 2, 2026
A fan literally jumped in and rushed to meet Ram Charan in the middle of the event but the bodyguard ran and put the fan outside
- WAIT FOR JANHVI KAPOOR REACTION pic.twitter.com/vCFsbHmTy7