टीव्ही मालिकेत सलग 10 वर्ष काम करणं कोणालाही सोपं नसतं, मात्र अभिनेत्री शुभांगी अत्रे हिने अंगुरी या पात्रात हे आव्हान अत्यंत यशस्वीरीत्या पार केलं. नुकतीच तिने मालिकेला पूर्णविराम दिला आणि तिच्या अनुभवाबाबत, टाइपकास्टिंगबाबत तसेच वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत.
शुभांगी म्हणाल्या, 'भाभीजी घर पर है’मधील अंगुरी ही व्यक्तिरेखा खूप छान लिहिली होती. मालिकेत विशिष्ट साच्यात भूमिका दिल्या जातात, पण अंगुरी वेगळी होती. मी पूर्वी कधीही अशा प्रकारची भूमिका केली नव्हती, त्यामुळे हा माझ्यासाठी एक प्रयोगच होता. 10 वर्ष कशी गेली कळलंच नाही. प्रेक्षकांचं मनोरंजन केल्याचं समाधान आणि त्यांचं भरभरून प्रेम मिळाल्यामुळे हा प्रवास अत्यंत सुखद आणि समाधानकारक होता.'
मालिका सोडण्याचा निर्णय वैविध्यपूर्ण कामासाठी आणि स्वत:साठी थोडा वेळ काढण्यासाठी घेतला. तिने सांगितले, "मी मालिकेत लगेच बाहेर पडत नाही; पहिला सीझन पूर्ण झाल्यानंतरच बाहेर पडतेय. आता मला वैयक्तिक आयुष्यात आणि करिअरमध्ये नवीन प्रयोग करण्याची संधी मिळेल. मोकळ्या वेळेत मी भटकंतीला जाईन आणि आयुष्यातील काही गोष्टी करू शकेन." गेल्या 10 वर्षांत शुभांगीने कलाकार आणि माणूस म्हणून खूप समृद्धी अनुभवली. तिने स्पष्ट केले, "या वर्षांत मला अभिनयात आणि वैयक्तिक आयुष्यात अनेक अनुभव आले. सहकलाकार अनुभवी असल्यामुळे त्यांच्याकडून शिकायला मिळालं. मालिकेनं मला प्रेम, नाव, ओळख, आणि प्रसिद्धी दिली.'
टाइपकास्टिंगबाबतही शुभांगीने मत व्यक्त केले, 'सोशल मीडियेमुळे कलाकार विशिष्ट प्रतिमेतून बाहेर येऊ शकतो. स्क्रीनवर मी अंगुरी म्हणून दिसले तरी लोक मला शुभांगी म्हणूनही ओळखतात, त्यामुळे मला टाइपकास्ट होण्याची भीती नव्हती.' ‘बिग बॉस’सारख्या रिअॅलिटी शोबाबत तिने सांगितले की, 'माझा स्वभाव भांडण्याचा नाही, त्यामुळे मी त्या शोमध्ये कधीच सहभागी होणार नाही. मात्र नृत्य किंवा इतर रिअॅलिटी शोसाठी विचार करेन.'
शुभांगीने तिच्या मुळाबद्दल आणि भाषाबाबतही खुलासा केला, 'माझ्या आडनावामुळे लोक मला मराठी समजतात, पण मी मूळची इंदूरची आहे. हळूहळू मी मराठी शिकतेय, मराठी सिनेमे पाहते आणि त्यामध्ये रस घेतेय. शिवाय बंगाली आणि मल्याळम सिनेमेही आवडीनं पाहते.' शुभांगी अत्रेचा प्रवास टीव्ही मालिकांमधील दीर्घकाळ कामाचा अनुभव, व्यावसायिक वाढ, वैयक्तिक निर्णय आणि भविष्यातील योजनांचा अद्वितीय अनुभव दर्शवतो. तिच्या या निर्णयामुळे प्रेक्षक आणि चाहत्यांमध्ये नवीन उत्सुकता निर्माण झाली आहे.
FAQ
शुभांगी अत्रेने ‘भाभीजी घर पर है’ सोडण्याचे कारण काय सांगितले?
तिने मालिकेला सोडण्याचा निर्णय वैविध्यपूर्ण कामासाठी, स्वत:साठी थोडा वेळ मिळवण्यासाठी आणि वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टी करण्यासाठी घेतला. पहिला सीझन पूर्ण झाल्यानंतर बाहेर पडणे तिला समाधानकारक वाटले.
टाइपकास्टिंगबाबत शुभांगीचे मत काय आहे?
सोशल मीडियेमुळे कलाकाराला विशिष्ट प्रतिमेतून बाहेर येण्याची संधी मिळते. त्यामुळे स्क्रीनवर अंगुरीच्या भूमिकेत दिसले तरी लोक तिला शुभांगी म्हणून ओळखतात आणि तिला टाइपकास्ट होण्याची भीती नाही.
शुभांगी ‘बिग बॉस’सारख्या रिअॅलिटी शोमध्ये जाणार आहे का?
तिचा भांडण्याचा स्वभाव नसल्यामुळे ती ‘बिग बॉस’मध्ये कधीच जाणार नाही. मात्र नृत्य किंवा इतर रिअॅलिटी शोसाठी विचार करू शकते.
कावेरी पिंपळे सध्या ‘झी २४ तास डिजिटल’मध्ये कंटेंट एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना पत्रकारितेचा चार वर्षांचा अनुभव आहे.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.