मराठी मनोरंजनविश्वात प्राजक्ता माळी हे नाव आज प्रत्येक घराघरात परिचित आहे. ‘जुळून येती माझी रेशीमगाठी’ मालिकेतील ‘मेघना’ या भूमिकेमुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ‘नकटीच्या लग्नाला यायचंच हं’ आणि पुढे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधूनही तिने स्वतःचा वेगळा ठसा उमटवला. निवेदन, अभिनय, होस्टिंग आणि स्वतःचा ज्वेलरी ब्रँड—या सर्व क्षेत्रांत प्राजक्ता सक्रिय असल्यामुळे तिचा सोशल मीडिया नेहमीच गजबजलेला असतो.
इन्स्टाग्रामवर 2.3 मिलियन फॉलोअर्स असलेल्या प्राजक्ताची अनेक फॅन पेजेसही तिचे फोटो, व्हिडिओ आणि कलाकृती सतत पोस्ट करत असतात. चाहत्यांचे हे प्रेम ती नेहमी हसत-हसत स्वीकारते आणि त्यांच्या मेहनतीचं कौतुकदेखील करते. मात्र अलीकडेच एका फॅन पेजने पोस्ट केलेल्या AI-जनरेटेड फोटोमुळे प्राजक्ता पहिल्यांदाच चांगलीच भडकली. तिच्या संमतीशिवाय AI तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेला हा फोटो तिने पाहताच ती संतापली आणि त्यावर थेट प्रतिक्रिया देत त्या फॅन पेजला इशारा दिला.
तिने स्वतःच तो फोटो शेअर करत लिहिले 'फोटो कितीही सुंदर दिसत असला, तरीही मी कधीच AI ने तयार केलेल्या फोटो किंवा व्हिडिओंचं कौतुक करणार नाही.' 'माझ्या सर्व फॅन क्लब्सना विनंती आहे असे AI फोटो आणि व्हिडिओ बनवणं तात्काळ थांबवा.' अभिनेत्रीचा हा स्पष्ट आणि ठाम संदेश सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे. कारण आजकाल अनेक कलाकारांचे फोटो AI च्या मदतीने बदलले जातात, बनावट व्हिडिओ तयार केले जातात, आणि त्यामुळे त्यांच्या प्रतिमेवर परिणाम होण्याची भीतीही व्यक्त केली जाते.
प्राजक्तानेही या धोक्यांकडे लक्ष वेधताना 'खऱ्या मेहनतीने केलेल्या कामाला आणि खरी ओळख जपणं सर्वात महत्त्वाचं' असा संदेश दिला आहे. तिच्या चाहत्यांनीही या पोस्टवर सकारात्मक प्रतिसाद देत तिच्या भूमिकेला पाठिंबा दिला. अनेकांनी लिहिलं 'बरोबर बोललात, AI misuse थांबायलाच हवा.' 'तुमची खरी सुंदरता AI ने बनवलेल्या फोटोमध्ये नाही, ती तुमच्या व्यक्तिमत्त्वात आहे.' तिच्या या भूमिकेमुळे मनोरंजनविश्वात AI वापरावर पुन्हा एकदा चर्चा रंगली असून, डिजिटल युगात कलाकारांच्या ओळखीचं संरक्षण किती आवश्यक आहे, याकडे लक्ष वेधलं जात आहे.
FAQ
प्राजक्ता माळी नेमक्या कोणत्या कारणामुळे भडकली?
एका फॅन पेजने तिचा AI-generated फोटो पोस्ट केल्यामुळे प्राजक्ता नाराज झाली. तिने स्पष्टपणे सांगितले की ती AI ने तयार केलेल्या फोटो/व्हिडिओंचं कौतुक करणार नाही.
प्राजक्ताने चाहत्यांना कोणती विनंती केली?
तिने सर्व फॅन क्लब्स आणि फॉलोअर्सना विनंती केली की AI फोटो किंवा व्हिडिओ तयार करणं आणि शेअर करणं थांबवा.
चाहत्यांनी प्राजक्ताच्या निर्णयावर कशी प्रतिक्रिया दिली?
बहुतेक चाहत्यांनी तिच्या भूमिकेचं समर्थन करत AI च्या गैरवापराबद्दल चिंता व्यक्त केली आणि तिच्या स्पष्ट भूमिकेचं कौतुक केलं.
कावेरी पिंपळे सध्या ‘झी २४ तास डिजिटल’मध्ये कंटेंट एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना पत्रकारितेचा चार वर्षांचा अनुभव आहे.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.