मराठी सिनेइंडस्ट्रीतल्या चर्चेतल्या नावापैकी एक नाव म्हणजे प्राजक्ता माळी . प्राजक्ता सोशल मीडियावरही सक्रिय असते. तिचा देसी लुक, मराठमोळा साज असो किंवा वेस्टर्न लुक...तिच्या फोटोंची चर्चा होत असते. तर ती तिच्या आयुष्यातले छोट्या-मोठ्या अपडेट्सही सोशल मीडियाद्वारे चाहत्यांपर्यंत पोहोचवत असते. आता प्राजक्तानं इन्स्टाग्रावर एक स्टोरी शेअर केली आहे. या तिनं एअरपोर्टमधला एक फोटो शेअर केला आहे. ती अनेकदा प्रवासादरम्यानचे फोटो शेअर करत असते. पण आता तिनं एक फोटो शेअर केलाय, त्यावर खास कॅप्शनही लिहिलं आहे, यात तिनं' बाय बाय मुंबई...' असं म्हटलं आहे. त्यामुळं प्राजक्ता नेमकी कुठं चालली आहे, असा प्रश्न तिच्या चाहत्यांनाही पडला.
तिनं याफोटोवर कॅप्शन लिहिलंय की, बाय बाय मुंबई. मला तुझी खूप आठवण येईल. मी लवकरच परत येईन... यास्टोरीनंतर प्राजक्ता नेमकी चालली तरी कुठं, असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. अनेकांनी ती देवदर्शनाला निघाली असावी, किंवा बेंगलोरच्या आश्रमात निघाली असावी....असा अंदाजही व्यक्त केला .पण थोड्याच वेळात प्राजक्तानं आणखी एक फोटो शेअर केला. यात हास्यजत्रेची टीम पाहायला मिळत आहे. यात सचिन मोटे, सचिन गोस्वामी, सई ताम्हणकर, प्रसाद ओक, अमित फाळके...अशी टीम दिसतेय. तर हे सगळे खास शोसाठी नागपुरात आसल्याचंही तिनं फोटोवर लिहिलं आहे.
दरम्यान, प्राजक्ता असा मोठा ब्रेक घेत तिच्या वैयक्तिक आयुष्याचा समतोल साधताना नेहमी दिसते. काही महिन्यांपूर्वी तिनं 12 ज्योतिर्लिंग यात्राही पूर्ण केली. भारतभर फिरून तिनं काहीच महिन्यात ही यात्रा पूर्ण केली होती. तर अनेकदा श्री श्री रविशंकर यांच्या बेंगलोरमधली आश्रमातही जात असते. दरम्यान, प्राजक्ताच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिनं अद्याप आगामी सिनेमांचे अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर केले नाहीये. काही दिवसांपूर्वी ती एका वेब सीरिजच्या प्रिमियरला आली होती. यावेळी तिच्या नो मेकअप लुकची बरीच चर्चाही झाली होती.
FAQ
प्राजक्ता माळीचा एअरपोर्ट फोटो शेअर केल्यावर चाहत्यांना काय उत्सुकता वाटली?
फोटोसोबत तिनं “बाय बाय मुंबई… मी लवकरच परत येईन” असं कॅप्शन दिलं, ज्यामुळे चाहत्यांना तिचा नेमका प्रवास कुठे आहे, हा प्रश्न पडला.
प्राजक्ता माळीचा फोटो कोणत्या शहरातला होता?
तिनं शेअर केलेला फोटो नागपुरातल्या हास्यजत्रे टीमच्या खास शोसाठीचा होता.
प्राजक्ता माळी सोशल मीडियावर कशाप्रकारे सक्रिय आहे?
प्राजक्ता तिच्या वैयक्तिक आयुष्याचे छोटे-मोठे अपडेट्स, प्रवासाचे फोटो, शूटिंगमधली झलक आणि आगामी प्रोजेक्ट्सबाबत माहिती सोशल मीडियावर चाहत्यांपर्यंत पोहोचवते.
कावेरी पिंपळे सध्या ‘झी २४ तास डिजिटल’मध्ये कंटेंट एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना पत्रकारितेचा चार वर्षांचा अनुभव आहे. ...Read More
|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.