बिग बॉसमध्ये प्रणित मोरेला झिरो स्क्रीन टाइम? अंकिता वालावलकर भडकली 'सगळं एडिटिंगवर अवलंबून आहे!'

प्रणितला चाहत्यांकडून जोरदार समर्थन मिळत आहे, तसेच अनेक मराठी कंटेंट क्रिएटर्सही त्याच्यासाठी पोस्ट करत आहेत. तरीही, अंकिता वालावलकरच्या मते बिग बॉस 19 मध्ये त्याला झिरो स्क्रीन टाइम मिळत आहे  

Intern | Updated: Oct 8, 2025, 04:32 PM IST
बिग बॉसमध्ये प्रणित मोरेला झिरो स्क्रीन टाइम? अंकिता वालावलकर भडकली 'सगळं एडिटिंगवर अवलंबून आहे!'

‘बिग बॉस’च्या यंदाच्या पर्वात मराठमोळा स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे सहभागी झाला आहे. सुरुवातीला प्रणित फारसा खेळत नव्हता, मात्र नंतर त्याने आपला खेळ दाखवण्यास सुरुवात केली आणि प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. प्रेक्षक आणि चाहत्यांकडून प्रणितला भरभरून सपोर्ट मिळत आहे, तर अनेक मराठी कंटेंट क्रिएटर्सही त्याच्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. मात्र, बिग बॉस 19 मध्ये प्रणितला झिरो स्क्रीन टाइम मिळत असल्याचं अभिनेत्री अंकिता वालावलकरने स्पष्ट केलं आहे. कोकण हार्टेड गर्लने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटलं, “पहिल्या आठवड्यात मराठी लोकांनी प्रणित मोरेला भरपूर सपोर्ट केला. गेल्या आठवड्यातही तसंच वातावरण दिसलं. पण वीकेंडच्या वारात प्रणितला जवळपास झिरो स्क्रीन टाइम मिळाला. या आठवड्यातही त्याला जास्त स्क्रीनवर दाखवणार नाहीत. आणि मग ‘तू काहीच करत नाहीस’ असं म्हणत त्याला घराबाहेर काढण्याचा ट्रेंड दिसेल. हा एडिटिंगचा खेळ आम्हालाही माहीत आहे. प्रणितसाठी व्होट करा. जय महाराष्ट्र!” गेल्या आठवड्यात बिग बॉस १९ मध्ये प्रणित नॉमिनेटेड होता, पण घराबाहेर कोणताही सदस्य गेला नाही. मात्र, या आठवड्यात एका सदस्याला घराचा निरोप घ्यावा लागणार आहे. यंदाच्या आठवड्यात प्रणित मोरेसह नीलम गिरी, मृदुल तिवारी, बसीर अली, अश्नूर कौर आणि झीशान कादरी हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत.

Add Zee News as a Preferred Source

प्रेक्षकांच्या चर्चेनुसार, घरातील खेळाडूंचा अनुभव आणि शोतील एडिटिंगमुळे वास्तव आणि टीव्हीवर दिसणाऱ्या गोष्टींमध्ये फरक दिसतो. प्रणितला जास्त वेळ स्क्रीनवर न दाखवण्यामागे एडिटिंगचा खेळ असल्याचं अंकिताचं मत आहे. या पार्श्वभूमीवर चाहत्यांसाठी प्रणितसाठी व्होट करणं अधिक महत्त्वाचं ठरत आहे. प्रेक्षक आणि चाहत्यांच्या लक्षात येत आहे की, प्रणितचा खेळ आणि त्याची व्यक्तिमत्वाची छाप जरी घरात दिसत नसली तरी, सोशल मीडियावर त्याला मोठा सपोर्ट मिळत आहे. या चाहत्यांचा उत्साह त्याला पुढील आठवड्यांमध्ये शोमध्ये टिकवून ठेवण्यास महत्त्वपूर्ण ठरेल. यंदाच्या पर्वात प्रणितसाठी प्रेक्षकांचा सपोर्ट आणि सोशल मीडियावर सक्रियता निर्णायक ठरणार आहे.

FAQ

प्रणित मोरेला ‘बिग बॉस 19’ मध्ये झिरो स्क्रीन टाइम का मिळाला?

अंकिता वालावलकरच्या म्हणण्यानुसार, शोमधील एडिटिंगमुळे प्रणितला कमी किंवा झिरो स्क्रीन टाइम दिला जात आहे.

प्रणितसाठी चाहत्यांकडून काय सपोर्ट मिळत आहे?

प्रेक्षक आणि मराठी कंटेंट क्रिएटर्स सोशल मीडियावर प्रणितसाठी पोस्ट करत आहेत आणि त्याला व्होट करण्यासाठी प्रेक्षकांना आवाहन करत आहेत.

या आठवड्यात कोणते सदस्य नॉमिनेट झाले आहेत?

प्रणित मोरेसह नीलम गिरी, मृदुल तिवारी, बसीर अली, अश्नूर कौर आणि झीशान कादरी या सदस्यांना या आठवड्यात नॉमिनेट केले आहे.

About the Author