आठ महिन्यांच्या गरोदर अभिनेत्रीचा हार्ट अटॅकने मृत्यू आणि बाळ...
Dr Priya Passed Away : सिनेसृष्टीला धक्का बसेल अशी मोठी बातमी समोर आली आहे. 35 वर्षीय अभिनेत्रीचा गरोदरपणात आठव्या महिन्यात मृत्यू झाला. कुटुंबियांसाठी अतिशय धक्कादायक माहिती.
साऊथच्या सिनेसृष्टी जगताला अतिशय मोठा धक्का बसला आहे. 35 वर्षीय गरोदर अभिनेत्रीचा आठव्या महिन्यात हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. लोकप्रिय मल्ल्याळम टिव्ही इंडस्ट्री लोकप्रिय अभिनेत्री डॉ प्रियाचे निधन झाले आहे. साऊथ टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादी डॉ.प्रिया यांच्या आकस्मिक निधनाने त्यांच्या कुटुंबावर आणि चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हृदयद्रावक बाब म्हणजे प्रिया 8 महिन्यांची गर्भवती होती.
मल्याळम टीव्ही अभिनेत्री डॉ.प्रिया यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर दक्षिणेतील अभिनेते किशोर सत्या यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर दिली आहे. सत्याने ही माहिती दिली आहे - "आमची लाडकी अभिनेत्री डॉ. प्रिया, जी 8 महिन्यांची गरोदर होती, ती आता या जगात नाही. हृदयविकाराच्या झटक्याने प्रियाचा मृत्यू झाला आहे. अभिनेत्रीच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबीयांची आणि प्रियजनांची अवस्था बिकट आहे.
बाळाला न पाहताच झाला मृत्यू
प्रियाने बाळाला पाहिले देखील नाही आणि तिचा मृत्यू झाला. प्रियाचे बाळ आयसीयूमध्ये आहे, पती नन्ना दु:खात आहेत. प्रियाचा अशाप्रकारे मृत्यू होणे हे टीव्ही जगताचे मोठे नुकसान असल्याचे डॉ. प्रियाला कोणत्याही प्रकारचा आजार नव्हता. कुणालाही डॉ. प्रियाच्या मृत्यूच्या बातमीवर विश्वास बसत नाहीये. अशातच अभिनेता सत्य किशोर यांनी डॉ.प्रिया यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. हे स्वाभाविक आहे कारण टीव्ही अभिनेत्री डॉ. प्रिया तिच्या अप्रतिम अभिनयासाठी प्रसिद्ध होत्या.
वयाच्या 35 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
प्रिया या टीव्ही सीरियलने प्रसिद्ध झालेल्या
अभिनेत्री म्हणून डॉ.प्रिया यांनी मल्याळम टीव्ही इंडस्ट्रीत आपली खास ओळख निर्माण केली होती. छोट्या पडद्यावरील चमकदार अभिनेत्रींमध्ये प्रियाचे नाव नेहमीच आघाडीवर असायचे. 'करुथमुथु' या टीव्ही मालिकेत तिच्या उत्कृष्ट अभिनयाने डॉ. प्रियाने चाहत्यांच्या हृदयावर आपली छाप सोडली. अभिनेत्री असण्यासोबतच ती डॉक्टरही होती. अशा परिस्थितीत अभिनेत्रीच्या मृत्यूने मल्याळम टीव्ही जगताला मोठा धक्का बसला आहे. मोठी गोष्ट म्हणजे वयाच्या २५ व्या वर्षी प्रियाचा मृत्यू झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.