)
Actress Went With Actor And His Wife For Honeymoon: अभिनेत्री प्रीती झिंटा ही अनेकदा इंडियन प्रिमिअर लीगच्या काळात चर्चेत असते. मात्र सध्या तिने केलेल्या एका पोस्टमुळे ती चर्चेत असून तिने एक विचित्र खुलासा या पोस्टमधून केला आहे. "सर्वात गोड जोडपे" असं म्हणत प्रीतीने तिच्या एका जवळचा मित्र आणि त्याच्या पत्नीसोबतचा सेल्फी पोस्ट केला आहे. हा मित्र प्रीतीच्या इतका जवळचा आहे की ती हे दोघे हनीमूनला गेले तेव्हा त्यांच्यासोबत होती. तिनेच याबद्दलची माहिती पोस्टमधून दिली आहे. हा मित्र कोण आणि तिने काय म्हटलंय पाहूयात...
प्रीतीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवरुन जी पोस्ट केलीये ती पोस्ट अभिनेता बॉबी देओल आणि त्याची पत्नी तान्या देओलसाठी आहे. या दोघांसाठी एक खास भावनिक पोस्ट प्रीतीने लिहिली आहे. काही दिवसांपूर्वी प्रीती मुंबईत मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत बॉबी आणि त्याच्या पत्नीला भेटली. या पार्टीमधील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले. या फोटो आणि व्हिडीओंमध्ये प्रीती आणि बॉबीला एकत्र पाहून नेटकऱ्यांना त्यांच्या 1998 च्या हिट चित्रपटाची म्हणजेच, 'सोल्जर'ची आठवण झाली.
मंगळवारी प्रीतीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर या जोडप्यासोबतचा एक सेल्फी शेअर केला. बरं या सेल्फीसोबत शेअर केलेल्या कॅप्शनमध्ये प्रीतीने ती या दोघांसोबत त्यांच्या हनिमूनलाही का गेली होती हे ही सांगितलं.
"काही मैत्रिची नाती काळानुसार अधिक परिपक्त होत जातात. तान्या आणि बॉबी पहिल्यांदा भेटल्यापासून (हो, दिवाळी पार्टीत हे दोघे भेटले होते आणि हो, मी तिथे होते आणि याच उपस्थितीच्या माध्यमातून थोड्याफार प्रमाणात का असेना त्यांच्या प्रेमकथेच्या सुरुवातीला मी या कथेचा भाग होते) ऑस्ट्रेलियातील 'सोल्जर' शूटपर्यंत मी त्यांच्यासोबतच होते. ऑस्ट्रेलियातील 'सोल्जर'चा शुटींग दौरा हा त्यांचा हनिमून देखील होता. त्यामुळेच मी तिथे त्यांच्यासोबत तिसरी व्यक्ती म्हणून होते. मी त्यांचे अगदी तिथे मनापासून मनोरंजन केले. वेळ असा सरसर निघून गेला पण त्या दोघांवरील माझे प्रेम आता वाढले आहे," असे प्रीतीने लिहिलं आहे.
"हे दोघे फक्त एकमेकांसाठीच बनलेले नाहीत तर ते सर्वात गोड जोडपे देखील आहे. त्यामुळे बऱ्याच दिवसांनी त्यांना भेटल्याने दिवाळीचा आनंद आणि गोड आठवणींना उजाळा मिळाला. माझ्याकडून या दोघांना आणि हे वाचणाऱ्या तुम्हा सर्वांना खूप सारं प्रेम," असे प्रीती म्हणाली आहे.
Some friendships just get better with time From the first time Tanya & Bobby met ( yes it was at a Diwali party and yes I was there and in a small way, was part of the start of their love story) to the Soldier shoot in Australia …. Which was also their honeymoon and I… pic.twitter.com/cBpzV6neQX
— Preity G Zinta (@realpreityzinta) October 14, 2025
मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीच्या व्हायरल क्लिप्समध्ये, बॉबी आणि प्रीती एकमेकांना शुभेच्छा देताना आणि आनंदाने गप्पा मारताना दिसत आहेत. या दोघांनी फोटोग्राफर्सला एकत्र पोज देखील दिली.
2007 साली 'झूम बराबर झूम' या चित्रपटासाठी प्रीती आणि बॉबी पुन्हा एकत्र आले. त्यांनी शाहरुख खानच्या 'ओम शांती ओम'मध्येही एक छोटीशी भूमिका केली होती. दरम्यान, व्यावसायिक आघाडीवर, प्रीती लवकरच बॉबीचा भाऊ सनी देओलसोबत 'लाहोर 1947' चित्रपटामधून पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. दुसरीकडे, बॉबीला सध्या आर्यन खानच्या दिग्दर्शित 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधील भूमिकेसाठी चर्चेत आहे.