हर्षची खास भेट! भारती सिंहच्या लक्झरी घड्याळावर प्रियंकाचे जबरदस्त उत्तर, कमेंट चर्चेत

भारती सिंहने आपल्या लेटेस्ट व्लॉग्समध्ये नवऱ्याने गिफ्ट दिलेली लाखो रुपयांचे घड्याळ दाखवले. त्यावर अभिनेत्री प्रियंका चोप्राने केलेली कमेंट सध्या चर्चेत आलीय.  

सोनेश्वर पाटील | Updated: Nov 9, 2025, 04:35 PM IST
हर्षची खास भेट! भारती सिंहच्या लक्झरी घड्याळावर प्रियंकाचे जबरदस्त उत्तर, कमेंट चर्चेत

Bharti singh Watch: कॉमेडीच्या दुनियेत ‘क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी आणि टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध होस्ट भारती सिंह सध्या आपल्या गर्भावस्थेचा आनंद घेत आहे. विशेष म्हणजे, या काळातही तिने पूर्णपणे कामातून ब्रेक घेतलेला नाही. भारती सध्या ‘लाफ्टर शेफ्स 3’ या शोमध्ये काम करत असून त्याचबरोबर ती आपल्या यूट्यूब चॅनलवरही नियमितपणे व्लॉग्स शेअर करत आहे.

Add Zee News as a Preferred Source

अलीकडेच तिच्या एका नव्या व्लॉगमध्ये भारतीने आपल्या चाहत्यांना एक खास सरप्राईज दिलं. तिच्या नवऱ्याने, म्हणजेच लेखक-निर्माता हर्ष लिंबाचियाने तिला एक महागडे लक्झरी घड्याळ भेट दिलं आहे.

हर्ष लिंबाचियाकडून भारतीला खास गिफ्ट

व्लॉगमध्ये भारतीने हे घड्याळ दाखवत आनंदाने सांगितलं, 'प्रियंका चोप्रा, ऐकतेयस ना? मीही तुझ्यासारखीच घड्याळ घेतली आहे!' यावर हर्ष मजेशीर अंदाजात म्हणाला, 'अगं, ती तुझा व्लॉग बघते का?' त्यावर भारतीने चाहत्यांना विनंती केली की, हा व्हिडिओ इतका शेअर करा की प्रियंका चोप्रापर्यंत ही गोष्ट पोहोचलीच पाहिजे!'

प्रियंका चोप्राचा भारतीला गोड प्रतिसाद

आश्चर्य म्हणजे, भारतीची ही गोष्ट खरोखरच प्रियंका चोप्रापर्यंत पोहोचली. प्रियंकाने भारतीच्या व्लॉगवर कमेंट करत लिहिलं की, 'मी बघतेय आणि हे घड्याळ तुझ्यावर माझ्यापेक्षाही जास्त सुंदर दिसते आहे. तू तर या ब्रँडची पुढची ब्रँड अॅम्बेसेडर आहेस. फक्त त्यांना अजून हे माहीत नाही'. प्रियंकाचा हा मजेशीर आणि गोड प्रतिसाद सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. चाहते दोघींवरही कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

भारती आणि हर्षचा सुंदर प्रवास

भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांची ओळख ‘कॉमेडी सर्कस’च्या सेटवर झाली होती. तिथेच दोघांची मैत्री प्रेमात बदलली आणि अखेर त्यांनी लग्न केलं. सध्या या जोडप्याला ‘गोला’ नावाचा मुलगा आहे. अलीकडेच भारतीने आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. ज्यामध्ये तिने ती पुन्हा एकदा प्रेग्नंट असल्याचे सांगितले. गणपती बाप्पा मोरया!'

भारती सिंह केवळ आपल्या विनोदासाठीच नाही तर तिच्या सकारात्मकतेसाठी, प्रामाणिक भावनांसाठी आणि उत्साही स्वभावासाठी देखील प्रेक्षकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. अशातच आता ती दुसऱ्यांदा आई होणार असल्यामुळे तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

FAQ

भारती सिंह सध्या काय करत आहे?

भारती सध्या ‘लाफ्टर शेफ्स 3’ या कॉमेडी शोमध्ये काम करत आहे आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर व्लॉग्स शेअर करत आहे.

भारतीला नवऱ्याने कोणतं खास गिफ्ट दिलं?

हर्ष लिंबाचियाने भारतीला एक महागडी लक्झरी घड्याळ भेट दिली, जी पाहून ती आनंदाने भारावून गेली.

प्रियंका चोप्राने भारतीच्या व्लॉगवर काय प्रतिक्रिया दिली?

प्रियंकाने भारतीच्या पोस्टवर कमेंट करत लिहिलं, “मी बघतेय आणि हे घड्याळ तुझ्यावर माझ्यापेक्षाही जास्त सुंदर दिसतंय. तू तर या ब्रँडची पुढची अॅम्बेसेडर आहेस!”

About the Author

Soneshwar Patil

सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

...Read More