कतार राजघराण्यातील राजकुमारी अल मयासा बिंत हमद अल-थानी ही नेहमीच चर्चेचा विषय असते. अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत असल्याने ती नेहमीच वृत्तवाहिन्यांसह सोशल मीडियावर झळकत असते. कतारचे माजी राजे शेख हमद बिन खलिफा अल थानी यांची मुलगी आणि सध्याचे राजे शेख तमीम बिन हमद अल थानी यांची बहीण असणाऱ्या अल मयासाला वेगळ्या प्रसिद्धीच गरज नाही.
शेखा अल-मयासा यांचे इंस्टाग्रामवर 10 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. पण ती स्वत: मात्र काही मोजक्या लोकांना फॉलो करते. ती इंस्टाग्रामवर ज्यांना फॉलो करते त्यांची यादी 500 पेक्षा कमी आहे. यामध्ये जागतिक नेते, सेलिब्रिटी, मध्य पूर्व आणि युरोपियन राजघराणे आणि फक्त एका बॉलिवूड अभिनेत्रीचा समावेश आहे.
शेखा अल-मयासा इंस्टाग्रामला फक्त एकाच बॉलिवूड अभिनेत्रीला फॉलो करते. तुम्ही कितीही डोकं खाजवलं तरी ही अभिनेत्री कोण याचा अंदाज लावू शकणार नाही. ही अभिनेत्री ऐश्वर्या राय किंवा प्रियांका चोप्रा नाही, तर मल्लिका शेरावत आहे.
मल्लिका शेरावत 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या मर्डर चित्रपटामुळे प्रसिद्धीस आली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. याशिवाय मल्लिकाने हॉलिवूडमधील चित्रपटांमध्येही काम केलं आहे.
पण कतारची राणी इतर बॉलिवूड सेलिब्रिटींना सोडून फक्त मल्लिका शेरावतलाच फॉलो का करते हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. 2010 च्या फिल्मीबिटच्या रिपोर्टनुसार, अभिनेत्रीने काही वर्षांपूर्वी अमेरिकेत कतारच्या राजघराण्याची भेट घेतली होती. यादरम्यान दोघींनाही निमंत्रित करण्यात आलं होतं. यानंतर दोघीही एकमेकीच्या संपर्कात राहिल्या आणि नंतर मैत्री निर्माण झाली.
2006 मध्ये राजकुमारीच्या लग्नाचं निमंत्रण मिळालेली मल्लिका ही एकमेव बॉलिवूड सेलिब्रिटी होती. 2010 मध्ये, तिने फ्रान्समधील कान्स येथे कतारच्या दोहा फिल्म इन्स्टिट्यूटच्या लाँचिंगलाही तिने हजेरी लावली होती.
शेखा अल-मयासाने 2205 मध्ये ड्यूक विद्यापीठातून राज्यशास्त्र आणि साहित्यात कला शाखेची पदवी मिळवली. पुढच्या वर्षी तिने दोहा येथे शेख जस्सिम बिन अब्दुलअझीझ अल थानी यांच्याशी लग्न केले. या जोडप्याला पाच मुले आहेत, ज्यामध्ये चार मुलं आणि एक मुलगी आहे.