Radhika Apte ला चित्रपटासाठी करावी लागली होती अश्लील गोष्ट, तरीही....

'ती न्यूड क्लिप लीक झाली आणि ड्रायव्हरपासून ते वॉचमॅनपर्यंत...'

Updated: Aug 2, 2021, 01:19 PM IST
Radhika Apte ला चित्रपटासाठी करावी लागली होती अश्लील गोष्ट, तरीही....

मुंबई : अभिनेत्री राधिका आपटे कायम तिच्या बोल्ड आणि हॉट अंदाजामुळे चर्चेत  असते. तिने आजपर्यंत अनेक चित्रपटामध्ये काम केलं. प्रत्येक चित्रपटातील तिची भूमिका अत्यंत खास होती. तिच्या अभिनयाचं सर्वचं स्तरातून कौतुक देखील झालं. पण हे यश मिळविण्यासाठी राधिकाला अनेक संकटांचा सामना देखील करावा लागला. अभिनेत्रीला एकदा ऑडिशनसाठी अश्लील गोष्टीही कराव्या लागल्या.

बोल्ड राधिका आपटेने चित्रपटांमध्ये भन्नाट भूमिका साकरल्या. पण एकदा तर ऑडिशनमध्ये तिला फोनवर अश्लील गोष्टी कराव्या लागल्या. राधिका नेहमी चित्रीकरणादरम्यान आलेले तिचे अनुभव उघडपणे सांगते. नेहा धुपियाच्या BFF व्हिथ वोगमध्ये राधिका,  राजकुमार रावसोबत आली होती. तेव्हा तिने एक मोठा खुलासा केला. 

राधिका म्हणाली, 'देव डी चित्रपटाच्या ऑडिशनसाठी मला फोनवर अश्लील गोष्टी करायच्या होत्या. मी ते केलं देखील कारण मला ऑडिशनमध्ये सिलेक्ट व्हायचं होतं. मला हे सर्वांसमोर करायचं होतं. मी फार उत्तम अभिनय केला. तरीही माझी निवड करण्याच आली नाही... '  असं राधिका म्हणाली.

शिवाय, जेव्हा राधिकाची न्यूड क्लिप व्हायरल झाली तेव्हा तिच्या ड्रायव्हरपासून ते वॉचमॅनपर्यंत सर्वांनी ओळखलं होतं की राधिका आहे. ग्रॅजिया (Grazia) मॅगजीनला दिलेल्या मुलाखतीत राधिका म्हणाली, 'जेव्हा "क्लीन शेव" च्या शूटिंग दरम्यान न्यूड क्लिप लीक झाली तेव्हा मला वाईट ट्रोल करण्यात आलं आणि त्याचा परिणाम माझ्या जीवनावर झाला. '

'अनेक दिवस मी घराबाहेर पडली नाही. मीडिया काय बोलेलं याचा विचार केला नव्हता. पण न्यूड क्लिप  व्हायरल झाली तेव्हा माझ्या ड्रायव्हरपासून ते वॉचमॅनपर्यंत सर्वांनी ओळखलं होतं . पुढे राधिका म्हणाली, 'मी यासर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केलं.'

'त्यामुळे जेव्हा  “पार्च्ड” चित्रपटासाठी न्यूड झाले, तेव्हा मला वाटलं आता लपवण्यासारखं काही नाही. न्यूड सीन देणं तेव्हा फार सोपं नव्हतं. स्क्रिनवर न्यूड होणं फार भीतीदायक होतं. पण आता मी  पूर्णपणे तयार आहे.' असं देखील राधिकाने सांगितलं आहे.'