''परिस्थितीमुळे माझ्यावर ही वेळ आली'', रघुबीर यादव यांच्या पत्नीचे त्यांच्यावर गंभीर आरोप

आमिर खानच्या 'लगान' आणि 'पीपली लाइव्ह' चित्रपटांतून लोकांची मने जिंकणारा अभिनेता रघुबीर यादव अडचणीत सापडला आहे.

Updated: Jul 16, 2021, 08:54 PM IST
''परिस्थितीमुळे माझ्यावर ही वेळ आली'', रघुबीर यादव यांच्या पत्नीचे त्यांच्यावर गंभीर आरोप

मुंबई : आमिर खानच्या 'लगान' आणि 'पीपली लाइव्ह' चित्रपटांतून लोकांची मने जिंकणारा अभिनेता रघुबीर यादव अडचणीत सापडला आहे. त्याची पत्नी पौर्णिमा खरगा हिच्याशी त्याचं अनेक वर्षांपासून वाद सुरु आहेत. दरम्यान, पूर्णिमाने पुन्हा एकदा रघुवीरवर गंभीर आरोप केले आहेत.

रघुवीरने दिले नाहीत पोटगीचे पैसे 
रघुबीर यादव आणि पत्नी पौर्णिमा खरगा हे दोघंही बऱ्याच दिवसांपासून विभक्त झाले आहेत. यापूर्वीही अभिनेता संजय मिश्रा यांच्या पत्नीशी प्रेमसंबंध असल्याचा आरोप करून पूर्णिमा चर्चेत आली होती. त्याचवेळी आता रघुबीर यादव यांच्या पत्नीने आरोप केला आहे की, त्यांना पोटगीचे पैसे मिळत नाहीत. त्यामुळे आता त्यांना त्यांचे दागिने गहाण ठेवावे लागले आहेत.

रघुबीरचा वकील काय म्हणाला?
हे विधान समोर आल्यानंतर रघुबीर यादव यांचे वकील म्हणाले की, पौर्णिमा अधिक पैशांची मागणी करत आहे. यासह, दुसऱ्या बाजूच्या पूर्णिमाचा वकील म्हणतो, रघुवीर आपल्या पत्नीला पैसे देऊ इच्छित नाही. या दोघांच्या घटस्फोटाचं प्रकरणही गंभीर बनलं आहे.

संजय मिश्रा यांच्या पत्नीसोबत लिव्ह-इनमध्ये रघुबीर
दोन वर्षांपूर्वी घटस्फोटाच्या प्रकरणात पूर्णिमाने रघुबीरवर अभिनेत्री आणि दिग्दर्शक नंदिता दास यांच्यासोबत अफेअर असल्याचा आरोप केला होता. यानंतर पूर्णिमा म्हणाली होती की, आता तो अभिनेता संजय मिश्राची पत्नी रोशनी आचरेजासोबत लिव्ह-इनमध्ये राहत आहे. महत्त्वाचं म्हणजे रघुबीर आणि पौर्णिमा आता वेगळे राहतात आणि त्यांचा 30 वर्षांचा मुलगा त्याच्या आईबरोबर राहतो.