राहुल गांधी 'धुरंधर'चे निर्माते? थिएरमध्ये सगळेच कन्फ्युज; '99 निवडणुका हरल्यानंतर...'

Dhurandhar Exicutive Producer: धुरंधर’ चित्रपटने रणवीर सिंगच्या दमदार अभिनय आणि अक्षय खन्नाच्या डेशिंग लूकमुळे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. दरम्यानच या चित्रपटातील क्रेडीट्सच्या यादीत राहुल गांधींचं नाव पाहून नेटकरी गोंधळेत. याचे स्क्रिनशोर्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर जाणून घ्या, नेमका घोळ काय?

Updated: Dec 15, 2025, 11:12 AM IST
राहुल गांधी 'धुरंधर'चे निर्माते? थिएरमध्ये सगळेच कन्फ्युज; '99 निवडणुका हरल्यानंतर...'

बॉलिवूडमधील एक्शन-थ्रिलर ‘धुरंधर’ चित्रपट त्याच्या पटकथा, अभिनय, डान्स आणि गाण्यांमुळे बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. अक्षय खन्ना, संजय दत्त, अर्जुन रामपाल आणि माधवन यांच्या दमदार अभिनयासह हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. 5 डिसेंबर 2025 रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ ला पहिल्या दहा दिवसांतच प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटाची एक्शन सीन्स, थ्रिलर आणि गाणी सोशल मीडियावर व्हायरल होत असताना चित्रपटाच्या ओपनिंगचा एक स्क्रिनशोट पाहून प्रेक्षक आणि नेटकरी सगळेच चक्रावलेत. 

Add Zee News as a Preferred Source

चाहत्यांमध्ये गोंधळ उडण्याचं कारण म्हणजे 'धुरंधर'च्या श्रेयनामावलीत राहुल गांधी हे नाव. याचा स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. 

‘धुरंधर’चे Exicutive produser राहुल गांधी?
‘धुरंधर’च्या ओपनिंग क्रेडीट्समध्ये कार्यकारी निर्माता म्हणून ‘राहुल गांधी’ हे नाव वाचून प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. याचा स्क्रीनशॉट सध्या एक्सवर (ट्विटर) तुफान व्हायरल होत आहे. हे नाव वाचून नेटकरी गोंधळून गेले आहेत. कार्यकारी निर्माते हे काँग्रेस सदस्य आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधीच आहेत का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रियासुद्धा दिल्या आहेत. एकाने या पोस्वर कमेंट करत ‘भाईसाहेब, हे कोणत्या क्षेत्रात आले’, असा प्रश्न विचारला तर दुसऱ्याने 'रस्ता भुल गये क्या?' असे विचारले आहे. तिसऱ्याने तर कमालच केली. त्याने लिहीले आहे ’99 निवडणुका हरल्यानंतर राहुल गांधीजींच्या कारकिर्दीत मोठा बदल’, असं दुसऱ्याने लिहिलं.

हे खरं आहे का?
‘धुरंधर’च्या ओपनिंग क्रेडिट्समध्ये दिसणाऱ्या राहुल गांधी या नावामागचं सत्य काहीस निराळंच आहे. धुरंधरच्या सुरुवातीच्या क्रेडीट लिस्टमध्ये उल्लेख केलेल्या राहुल गांधींचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. राहुल गांधी या नावाचे ज्येष्ठ निर्माते बॉलिवूड इंडस्ट्रीत असून ते दीर्घकाळापासून हिंदी चित्रपटसृष्टीचा एक भाग आहेत. हा काही त्यांचा पहिला चित्रपच नाही तर त्यांनी यापूर्वी ‘रुस्तम’, ‘मुंबई डायरीज’, ‘रॉकेट बॉईज’, ‘फर्जी’, ‘द फॅमिली मॅन’, ‘लकी भास्कर’ यांसारख्या हिट चित्रपट आणि वेब सीरिजची निर्मिती केली आहे.

हे ही वाचा: Akshaye Khanna Dhurandhar : याला म्हणतात खरं प्रेम; अक्षय खन्नाच्या एक्स गर्लफ्रेंडची भावनिक पोस्ट तुफान व्हायरल

dhurandraa

‘धुरंधर’ या चित्रपटाविषयी प्रत्येक खरी खोटी माहिती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळेच हा घोळ चाहत्यांसमोर आला असावा. पम हा काही घोळ नसून नाव आणि आडनाव सरखे असल्यामुळे घडलं आहे. धुरंधर चित्रपटाचा दुसरा भाग ‘धुरंधर 2 : द रिव्हेंज’ पुढच्या वर्षी ईद-उल-फित्रच्या निमित्तनाने चित्रपटगृहांचे दार ठोठावणार आहे.  19 मार्च 2026 रोजी प्रदर्शित होणऱ्या या स्पाय थ्रिलर चित्रपटाचं लेख, सहनिर्मिती आणि दिग्दर्शक आदित्य धरने केलं आहे. मल्टिस्टारर चित्रपट असूनही प्रत्येक भूमिकेला यात समान न्याय मिळाला आहे. या चित्रपटाने आत्ता पर्यंतचे मोठमोठे रिकोर्ड मोडले असून 372.82 कोटींची बक्कळ कमाई केली आहे. 

About the Author