Celebs On Varanasi Teaser: एसएस राजामौली दिग्दर्शित महेश बाबू आणि प्रियांका चोप्रा यांच्या बहुप्रतिक्षित 'वाराणसी' चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित झाला. दिग्दर्शक राजामौली यांनी हैदराबादमध्ये भव्य कार्यक्रमात त्यांच्या आगामी 'वाराणसी' हा लूक रिलीज केला. अभिनेता महेश बाबूच्या लूकने केवळ नेटिझन्सनाच नव्हे तर सेलिब्रिटींनाही भुरळ घातली आहे. आता, चित्रपट निर्माता करण जोहर आणि प्रशांत नील, दक्षिणेतील अभिनेता ब्रह्माजी यांनीही चित्रपटाच्या फर्स्ट लूकचे भरभरुन कौतुक केले आहे.
करण जोहर काय म्हाणाला?
बॉलिवूड निर्माता करण जोहरने आजवर बरेच सुपर हिट चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. दरम्यान त्याच्या अलीकडील पोस्टवरुन हे स्पष्ट होतयं की दिग्दर्शक एस एस राजामौलीच्या कामाची बरोबरी कोणीच करु शकत नाही स्वतः करण जोहरही नाही. त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर 'वाराणसी' चित्रपटातील रुद्राच्या भूमिकेत महेश बाबूच्या पहिल्या लूकचे कौतुक केले. पोस्ट शेअर करताना त्याने लिहिले, "फॅन्टास्टिक. एसएस राजामौलीसारखा कोणीच नाही."

निर्माता प्रशांत नीलने आभार का मानले?
चित्रपट निर्माते प्रशांत नील यांनीही आपला उत्साह व्यक्त करत लिहिले, "धन्यवाद एसएस राजामौली सर. महेश बाबू अद्भुत दिसत आहेत. मी खूप उत्साहित आहे."
Take a bow, @ssrajamouli sir!@urstrulyMahesh looks absolutely charming. Super excited #GlobeTrotter #Varanasi https://t.co/qwjABAUAGt
— prashanth Neel (@Prashant_neell) November 15, 2025
सर्व स्तरावरुन शुभेच्छांचा वर्षाव
चित्रपटाचे संगीतकार थमन एस देखील 'वाराणसी' च्या पहिल्या लूकने खूपच प्रभावित झाले. त्यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट केले, "आमचा लाडका सुपरस्टार महेश बाबू. 'वाराणसी' बद्दल क्रेझ आहे. 'पुष्पा 2: द रूल' मधील दमदार भूमिकेसाठी ओळखला जाणारा तेलुगू अभिनेता ब्रह्माजी यानेही लूकवर तसेच टीझरवर प्रतिक्रिया देत लिहिले, "OMG,अवतारांचा अवतार आहे"
Our Dear Super Star @urstrulyMahesh gaaru !! #Varanasi
What a highhhhhhhhhhhhhhhhhh pic.twitter.com/c9zslySx0r
— thaman S (@MusicThaman) November 15, 2025
चित्रपटाच्या टीझरमध्ये काय आहे?
एसएस राजामौली यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'एसएसएमबी 29', ज्याचे नाव आता अधिकृतपणे 'वाराणसी' असे बदलण्यात आले आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच धुमाकुळ घालत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे टीझर रीलिझ झाल्याच्या 10 ते 16 तासांतच त्याला 58 लाखाच्यावर व्युव्हज गेले आहेत. यामध्ये वाराणसी शहराची दिव्यता, भव्य इमारती आणि एकूण एक सौदर्याची झलक दाखवण्यात आली आहे. त्याशिवाय यामध्ये पौराणिक कथांचाही उल्लेख आहे. या टीझरमध्ये महेश बाबू नंदीवर बसलेला दिसले असून त्याच्या हातात त्रिशूळ देखील दिसत आहे. या रुद्राची झलक पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये एक वेगळाच उत्साह दिसून येतोय.
LIVE|
NZ
205(75 ov)
|
VS |
WI
22/0(7.4 ov)
|
| Full Scorecard → | ||
|
MAS
(20 ov) 75/9
|
VS |
INA
78/3(9 ov)
|
| Malaysia beat Indonesia by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
INA
(20 ov) 75/9
|
VS |
MAS
78/3(9 ov)
|
| Malaysia beat Indonesia by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
IND
(20 ov) 175/6
|
VS |
SA
74(12.3 ov)
|
| India beat South Africa by 101 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.