)
Rajinikanth : दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील थलायवा म्हणून ओळखले जाणारे सुपरस्टार रजनीकांत सध्या आपल्या कामातून थोडा ब्रेक घेऊन ऋषिकेश येथे अध्यात्मिक प्रवासासाठी पोहोचले आहेत. त्यांच्या या प्रवासातील काही फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये रजनीकांत अत्यंत साधेपणाने आणि सर्वसामान्य माणसांसारखे रस्त्याच्या कडेला जेवण करताना दिसत आहेत. त्यांच्या या साध्या रूपाने आणि जमिनीवरच्या वागणुकीने चाहते थक्क झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रजनीकांत स्वामी दयानंद आश्रम ऋषिकेश येथे गेले होते आणि त्यांनी स्वामी दयानंद सरस्वतींना श्रद्धांजली अर्पण केली. प्रवासादरम्यान त्यांनी गंगा घाटावर ध्यानधारणा केली आणि गंगा आरतीत सहभाग घेतला. या अध्यात्मिक क्षणांचे अनेक फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
काही छायाचित्रांमध्ये रजनीकांत पांढरे पारंपरिक कपडे घालून एका पुलावर बसून साधे जेवण घेताना दिसत आहेत. त्यांच्या मागे त्यांची कार उभी असल्याचंही एका फोटोमध्ये दिसतं आहे. दुसऱ्या एका फोटोमध्ये ते आश्रमातील लोकांशी संवाद साधताना दिसत आहेत तर एका फोटोत ते पुजाऱ्यासोबत पूजा-अर्चा करताना पाहायला मिळत आहेत.
या सर्व फोटोंमधून रजनीकांत यांचा साधेपणा, विनम्रता आणि अध्यात्मिकतेकडे ओढ स्पष्टपणे जाणवते. त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. अनेकांनी 'खरा महानायक तोच जो इतका मोठा असूनही इतका साधा आहे' अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Superstar Rajinikanth has stepped away from his acting projects to undertake a spiritual journey in the Himalayas#simplicity #Rajnikanth #southindia pic.twitter.com/P85sz4dvrM
— Nature Explorer (@Patel45Nature) October 5, 2025
अलीकडेच रजनीकांत यांनी अभिनेता ते राजकारणी बनलेले विजय यांच्या पक्ष टीव्हीकेच्या रॅलीत झालेल्या दुर्घटनेबद्दल आपली संवेदना व्यक्त केली होती. त्यांनी एक्स (पूर्वी ट्विटर) वर लिहिले होते की, 'करूरमध्ये झालेल्या घटनेत निरपराध लोकांचा मृत्यू झाल्याचं ऐकून मन हेलावून गेलं. या दुर्घटनेत आपले प्रियजन गमावलेल्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत. जखमींना लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना' असं म्हटलं होतं.
रजनीकांत शेवटचे ‘कुली’ या चित्रपटात दिसले होते. या चित्रपटात नागार्जुन आणि श्रुती हासन यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका होत्या. हा चित्रपट 14 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला होता. सध्या ते ‘जेलर-2’ या त्यांच्या पुढील चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
FAQ
रजनीकांत यांचा ऋषिकेश प्रवास कशासाठी?
दक्षिण चित्रपटसृष्टीतील थलायवा रजनीकांत यांनी ‘कुली’ चित्रपटानंतर ब्रेक घेऊन ऋषिकेश येथे अध्यात्मिक प्रवास केला. ते स्वामी दयानंद आश्रमात गेले आणि स्वामी दयानंद सरस्वतींना श्रद्धांजली अर्पण केली.
व्हायरल फोटोंमध्ये रजनीकांत कसे दिसत आहेत?
फोटोंमध्ये रजनीकांत पांढरे पारंपरिक कपडे घालून रस्त्याच्या कडेला साधे जेवण करताना दिसत आहेत. त्यांच्या मागे कार उभी असल्याचे दिसते, ज्यामुळे त्यांचा साधेपणा जाणवतो.
रजनीकांत यांनी ऋषिकेशमध्ये काय केले?
रजनीकांत यांनी गंगा घाटावर ध्यानधारणा केली आणि गंगा आरतीत सहभाग घेतला. आश्रमातील लोकांशी संवाद साधला आणि पुजाऱ्यासोबत पूजा-अर्चा केली.