Villain on Molestation Scene with Madhuri Dixit : 70 आणि 80 च्या दशकातील लोकप्रिय खलयानकाची भूमिका साकारणारे रंजीत यांनी आतापर्यंतच्या करिअरमध्ए 500 पेक्षा जास्त चित्रपट केले आहेत. त्यांनी अनेक लोकप्रिय कलाकार आणि अभिनेत्रींसोबत काम केलंय रेखा, रीना रॉय ते माधुरी दीक्षितपर्यंत त्यांनी सगळ्यांसोबत काम केलं आहे. या अभिनेत्रींसोबत रंजीत यांचे मोलेस्टेशन आणि रेप सीन विषयी रंजीत यांनी याविषयी अनेकदा चर्चा केली आहे. रंजीत यांनी सांगितलं की जेव्हा माधुरीला सांगण्यात आलं की तिला रंजीत यांच्यासोबत विनयभंगाचा (मोलेस्टेशन) सीन शूट करायचा आहे. तेव्हा ती रडू लागली होती.
रंजीतनं 'विकी लालवानी'ला दिलेल्या एका मुलाखतीत हा प्रसंग सांगितला. 1989 मध्ये प्रदर्शित झालेला 'प्रेम प्रतिज्ञा' या चित्रपटाचं दिग्दर्शन बापू यांनी केलं होतं. तोपर्यंत माधुरीनं फक्त पाच चित्रपटांमध्ये काम केलं होतं आणि ती नवीच अभिनेत्री होती. रंजीत यांनी सांगितलं की "चित्रपटाचं नाव 'प्रेम प्रतिज्ञा' होतं. माधुरी तेव्हा नवीन अभिनेत्री होती. माझी प्रतिमा ही एका क्रृर आणि हत्या करणाऱ्या घाणेरड्या खलनायकाची होती. मुलं-मुली मला घाबरायचे. माधुरीनं माझ्या विषयी ऐकलं होतं आणि ती घाबरली होती. आम्हाला सोबत एक विनयभंगाचा सीन शूट करायचा होता. वीरू देवगण हे फाइट मास्टर होते. सीन असा होता की मला एक ठेल्याजवळ तिची छेड काढायची होती. मी माझ्या दुसऱ्या शूटिंगसाठी जरा घाईत होतो आणि सेटवर तिची परिस्थिती काय आहे त्याविषयी मला काहीच कल्पना नव्हती. माधुरी विषयी मला खूप वेळानंतर कळलं."
रंजीत यांनी पुढे सांगितलं की "मला या गोष्टीची जाणीव झाली की ती रडत होती. मग मी जाऊन तिची सांत्वन केली आणि तिला सांगितलं की मी एक चांगला माणूस आहे. अखेर, शॉट देण्यासाठी ती तयाक झाली. तर जेव्हा आम्ही शॉट देत होतो, तेव्हा मी माझ्या सहकलाकारांसोबत कोऑपरेटिव्ह राहतो. सीन कट झाल्यानंतर लोकांनी टाळ्या वाजवल्या. माधुरी रडत होती, निर्माते आणि इतर लोकं तिच्याकडे धावत गेले आणि तिला विचारलं की 'तू ठिक आहेस ना?' माधुरीनं सांगितलं की 'मला कोणत्या गोष्टीची जाणीव झाली नाही. त्यांनी मला स्पर्श देखील केला नाही.'"
रंजीत यांनी पुढे सांगितलं की "माधुरी दीक्षितला त्यांनी स्पर्श देखील केला नव्हता आणि फक्त ठेल्यावर झोपवून इथे तिथे फिरवत टॉर्चर केलं होतं." 'प्रेम प्रतिज्ञा' या चित्रपटानंतर रंजीत आणि माधुरी यांनी 'किशन कन्हैया' आणि 'कोयला' मध्ये काम केलं.