Raveena Tandon Daughter: 90च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री रवीना टंडनने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. तसेच तिची मुलगी राशा थडानीने अलीकडेच 'आझाद' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ज्यात ती अजय देवगणच्या पुतण्या आमन देवगणसोबत झळकली. चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक कपूर यांनी तिच्या नृत्यकौशल्याचे विशेष कौतुक केले आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर संमिश्र प्रतिसाद मिळवला असला, तरी राशाच्या अभिनय आणि नृत्याने तिला एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. तिला खरी प्रसिद्धी मिळाली ती म्हणजे 'उई अम्मा' गाण्यातील नृत्यामुळे. तिच्या डान्स मूव्हजचे सर्वांनी कौतुक केले आहे.
'झी सिने अवॉर्ड्स 2025' मध्ये अनेक कलाकार चमकले. यावेळी राशा थडानीही तिथे पोहोचली होती. मंचावर राशा तिच्या आईच्या गाण्यावर नाचताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. अनेक नेटकऱ्यांनी म्हटले, 'ती इतर स्टार किड्सपेक्षा वेगळी आहे.' तर काही नेटकरी म्हणाले, 'ही मुलगी काहीतरी मोठे करेल.' अनेक नेटकऱ्यांनी तिचे खूप कौतुक केले आहे.
राशाने 'टिप टिप बरसा पानी' या गाण्यावर नृत्य सादर केले. एवढेच नाही तर माधुरी दीक्षितच्या 'एक दो तीन' आणि तिच्या स्वतःच्या डेब्यू चित्रपटातील 'उई अम्मा' या गाण्यांवरही अप्रतिम नृत्य सादर केले. तिच्या या सादरीकरणाने सोशल मीडियावर मोठी चर्चा निर्माण केली आहे. अनेकांनी राशाला 'नेक्स्ट जनरेशन डान्सिंग स्टार' असेही संबोधले आहे.
1994 मध्ये रवीना टंडन आणि अक्षय कुमार यांचा 'मोहरा' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात रवीना टंडनने रोमा सिंगची भूमिका साकारली होती. या चित्रपटात अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांच्यातील केमिस्ट्रीचे खूप कौतुक झाले. चित्रपटात दोघांमध्ये अनेक रोमँटिक दृश्येही पाहायला मिळाली आणि हे त्याच चित्रपटातील एक गाणे आहे. राशाचा अभिनय पाहिल्यानंतर सर्वजण रवीना टंडनचे कौतुक करत आहेत.
हे ही वाचा: प्रसिद्ध निर्मातीच्या चित्रपटातून श्रद्धा कपूरची माघार, 'या' गोष्टींवरुन वाद झाल्याची चर्चा
राशा थडानीचे सोशल मीडियावर अनेक चाहते आहे. तिला 30 लाखहून अधिक लोक इन्स्टाग्रामवर फॉलो करतात. तिने वयाच्या 20व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. आता, अशी चर्चा आहे की ती लवकरच कार्तिक आर्यनसोबत चित्रपटात दिसणार आहे. तिने अलिकडेच तिच्या आईची साडी नेसून पुरस्कार सोहळ्याला देखील हजेरी लावली होती.
राशा थडानीच्या या यशस्वी प्रवासामुळे तिच्या आईचा म्हणजेच रवीना टंडनचा अभिमान वाढला आहे. तिच्या नृत्यकौशल्याने आणि अभिनयाने ती बॉलिवूडमध्ये आपली वेगळी छाप सोडत आहे.