रश्मी देसाईवर बिग बॉस स्पर्धकाला घाणेरड्याप्रकारे स्पर्श केल्याचा आरोप

 'बिग बॉस 15'ला थोडं मजेशीर बनवण्यासाठी शोचे निर्माते सतत मेहनत घेत आहेत.

Updated: Dec 1, 2021, 07:17 PM IST
रश्मी देसाईवर बिग बॉस स्पर्धकाला घाणेरड्याप्रकारे स्पर्श केल्याचा आरोप

मुंबई : 'बिग बॉस 15'ला थोडं मजेशीर बनवण्यासाठी शोचे निर्माते सतत मेहनत घेत आहेत. अलीकडेच बिग बॉसच्या घरात चार वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून दाखल झाले आहेत. त्यापैकी एक म्हणजे रश्मी देसाई. उमर रियाझसोबत अभिनेत्रीचं नातं सध्या अधिकच घट्ट होत चाललं आहे. दरम्यान, अभिनेत्रीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात दावा केला जात आहे की, तिने उमर रियाझला घाणेरड्याप्रकारे स्पर्श केला आहे.

रश्मीने उमरला विचीत्र स्पर्श का केला?
बिग बॉसच्या घरातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री मस्ती करताना दिसत आहे. ज्या अँगलमधून हा व्हिडिओ काढण्यात आला आहे. ते पाहता रश्मी देसाईने उमर रियाझच्या पायाच्या मागच्या बाजूने स्पर्श केल्याचं दिसत आहे आणि आता सोशल मीडियावर त्याविषयी चर्चा सुरू आहे. या अभिनेत्रीच्या विरोधात आता अनेकजण समोर आले आहेत.

काय आहे सत्य 
या व्हिडिओवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. ज्यामध्ये रश्मीने संमतीशिवाय उमरला स्पर्श केला होता. व्हिडीओ बारकाईने पाहिल्यास रश्मी उमरच्या गुडघ्याला अचानक धक्का देऊन त्याला चिडवत आहे. मात्र जर तुम्ही नीट पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की, रश्मी देसाईने कोटच्या खिशातून हातही काढला नाही. त्यामुळे काहीजण तिने केलेल्या गंमतीचं कौतुकही करत आहे.

रश्मी शोचा टीआरपी वाढवते
रश्मी देसाई 'बिग बॉस 13' चा भाग होती. या शोने भरपूर टीआरपी मिळाला होता. याच कारणामुळे जेव्हा जेव्हा बिग बॉसचा टीआरपी घसरतो तेव्हा या शोमध्ये तिला बोलावलं जातं. रश्मी देसाई आणि राखी सावंत या बिग बॉसच्या टीआरपी गेनर्स मानल्या जातात आणि म्हणूनच त्यांना वेळोवेळी शोमध्ये गेस्ट म्हणून बोलावण्यात आलं आहे.