साखरपुड्यानंतर रश्मिका मंदानाची पहिली पोस्ट, चाहत्यांना दिलं सरप्राईज, म्हणाली- मला माहित आहे तुम्ही याच क्षणाची...

Rashmika Mandanna: नॅशनल क्रश रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा त्यांच्या साखरपुड्याच्या बातमीमुळे खूपच चर्चेत आहेत. अशातच रश्मिकांना पोस्ट शेअर करत चाहत्यांना सरप्राईज दिलं आहे.   

सोनेश्वर पाटील | Updated: Oct 5, 2025, 07:04 PM IST
साखरपुड्यानंतर रश्मिका मंदानाची पहिली पोस्ट, चाहत्यांना दिलं सरप्राईज, म्हणाली- मला माहित आहे तुम्ही याच क्षणाची...

Rashmika Mandanna : साउथ चित्रपटांच्या चाहत्यांसाठी मोठा उत्साहाचा विषय आहे की, 'नेशनल क्रश' रश्मिका मंदाना आणि सुपरस्टार विजय देवरकोंडा यांचा साखरपुडा झाल्याची बातमी समोर आली होती. सोशल मीडियावर दोघांच्या साखरपुड्याच्या बातम्यांनी चर्चेला जोर धरला आहे. रिपोर्ट्सनुसार, या जोडीने 3 ऑक्टोबर 2025 रोजी हैदराबादमध्ये एका प्रायव्हेट ठिकाणी एकमेकांना रिंग घालून साखरपुडा केला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

सगळ्यांना अपेक्षा होती की, रश्मिका मंदाना या साखरपुड्यावर प्रतिक्रिया देईल पण तिने चाहत्यांना सरप्राइज दिले. रश्मिका मंदानाने इन्स्टाग्रामवर या चर्चांदरम्यान पहिली पोस्ट शेअर केली पण साखरपुड्याबाबत काही सांगण्याऐवजी तिने आपल्या अपकमिंग चित्रपट 'द गर्लफ्रेंड' चा टीझर प्रदर्शित केला. 

रश्मिकाच्या पोस्टमध्ये काय? 

साखरपुड्याच्या चर्चा सुरु असतानाच रश्मिका मंदानाने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून चाहत्यांना सरप्राईज दिलं आहे. तिने तिच्या आगामी चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. पोस्ट शेअर करताना तिनं कॅप्शनमध्ये म्हटलं की, 'मला माहिती आहे की तुम्ही याची वाट पाहत होतात, आणि ही राहिली... #TheGirlfriend, 7 नोव्हेंबर 2025 पासून सिनेमागृहात तेलुगू, तमिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळम भाषेत असं म्हटलं आहे. 

रश्मिकाच्या या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये मोठा गोंधळ उडाला. काही मिनिटांमध्ये तिच्या या पोस्टला लाखो लाईक्स मिळाले. एका चाहत्याने कमेंट केली की, साखरपुड्याची बातमी खरी आहे का? तर दुसऱ्या लिहिले की, 7 नोव्हेंबरचा दिवस आठवणींमध्ये राहील. क्वीन परत आली आहे! तिसऱ्याने लिहिले, 'विजय आणि रश्मिका – भारतातील सर्वात सुंदर जोडी!

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

चाहत्यांना अधिकृत घोषणेची प्रतिक्षा

'द गर्लफ्रेंड' चित्रपटाचे दिग्दर्शन राहुल रविंद्रन यांनी केले आहे. या चित्रपटात रश्मिका मंदानाच्या विरुद्ध अभिनेता दीक्षित शेट्टी दिसणार आहेत. टीझरमध्ये रश्मिका आणि दीक्षित शेट्टीच्या पात्रांमधील संवाद दाखवला आहे, जे नातेसंबंध आणि समजुतीवर आधारित रोमँटिक ड्रामा दर्शवितो. विशेष म्हणजे, विजय देवरकोंडा यांनी या चित्रपटासाठी व्हॉइस-ओव्हर दिला आहे. ज्यामुळे चाहत्यांसाठी चित्रपट आणखी खास बनला आहे.

जिथे काही चाहते रश्मिकाच्या चित्रपटाबद्दल उत्साही दिसले, तिथेच अनेकांना अजूनही त्यांच्या साखरपुड्याच्या अधिकृत घोषणेची प्रतिक्षा आहे. पण नक्की म्हणजे, रश्मिकाचा प्रत्येक पोस्ट आता तिच्या आणि विजयच्या चाहत्यांसाठी मोठ्या बातमी इतकी महत्वाची ठरत आहे.

FAQ

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांचा साखरपुडा कधी झाला?

रिपोर्ट्सनुसार, रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांचा साखरपुडा ३ ऑक्टोबर २०२५ रोजी हैदराबादमध्ये एका प्रायव्हेट ठिकाणी झाला. दोघांनी एकमेकांना रिंग घालून साखरपुडा केला, ज्यामुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली.

साखरपुड्याच्या बातमीला सोशल मीडियावर कसा प्रतिसाद मिळाला?

साखरपुड्याच्या बातमीने चाहत्यांमध्ये उत्साहाची लहर उसळली. #RashVijayEngaged ट्रेंड झाला, आणि चाहते म्हणत आहेत, ‘भारतातील सर्वात सुंदर जोडी!’ मात्र, अधिकृत घोषणा नसल्याने कुतूहल वाढले.

रश्मिकाने साखरपुड्यावर प्रतिक्रिया का दिली नाही?

साखरपुड्याच्या चर्चा सुरू असतानाच रश्मिकाने इन्स्टाग्रामवर ‘द गर्लफ्रेंड’ चित्रपटाचा टीझर शेअर केला. तिने कॅप्शनमध्ये म्हटले, ‘मला माहिती आहे की तुम्ही याची वाट पाहत होतात... #TheGirlfriend, ७ नोव्हेंबर २०२५ पासून सिनेमागृहात.’

About the Author

Soneshwar Patil

सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

...Read More