31 वर्ष मोठ्या सलमान खानसोबत स्क्रिन शेअर करण्याची ऑफर मिळताच कशी होती रश्मिकाची प्रतिक्रिया? खुलासा करत अभिनेत्री म्हणाली...

Rashmika Mandanna on Working With Salman Khan :  रश्मिका मंदानानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Mar 30, 2025, 08:25 AM IST
31 वर्ष मोठ्या सलमान खानसोबत स्क्रिन शेअर करण्याची ऑफर मिळताच कशी होती रश्मिकाची प्रतिक्रिया? खुलासा करत अभिनेत्री म्हणाली...
(Photo Credit : Social Media)

Rashmika Mandanna on Working With Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि रश्मिका मंदाना यांचा 'सिकंदर' हा चित्रपट आज 30 मार्च रोजी ईदच्या निमित्तानं सगळ्यांच्या भेटीला आला आहे. त्या दोघांची जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. त्या दोघांना एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत पण सलमान खान आणि रश्मिका मंदानाच्या वयात असलेल्या 31 वर्षांच्या या वयाच्या फरकावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. तर रश्मिकानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की तिला सलमानसोबत चित्रपट करण्याची ऑफर मिळाली तेव्हा तिची पहिली प्रतिक्रिया काय होती?

Add Zee News as a Preferred Source

रश्मिकानं आजतक/ इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत रश्मिकानं 'सिकंदर' मध्ये सलमानसोबत काम करण्याच्या अनुभवावर वक्तव्य केलं आहे. रश्मिकानं सलमानसोबत काम करण्याची संधी कशी मिळाली आणि जेव्हा तिला ऑफर मिळाली तेव्हा तिची काय प्रतिक्रिया होती याविषयी सांगितलं आहे. 

सलमान खानसोबत स्क्रीन शेअर करण्याविषयी बोलताना रश्मिका म्हणाली, "मला जेव्हा पहिल्यांदा 'सिकंदर' साठी कॉल करण्यात आला होता तेव्हा मला आश्चर्याचा धक्का बसला. कारण मला आधी अभिनेत्री व्हायचं नव्हतं. पण मी अभिनेत्री झाली आणि आता अशा ठिकाणी आहे की जेव्हा मला सलमान खानसोबत काम करण्याची संधी मिळते. तर एक अभिनेत्री म्हणून असं वाटतं की तुम्ही नक्कीच चांगलं काम केलं असणार. कारण जर मी काम केलं नसतं तर मला ही संधी मिळाली नसती."

याविषयी सांगताना रश्मिका म्हणाली, "मला जेव्हा 'सिकंदर'साठी फोन आला तेव्हा मला हे जाणवलं होतं की मला कमर्शियल चित्रपट करायचे आहेत. पण मला कमर्शियल चित्रपटांची डेप्थ हवी होती. मला कमर्शियल चित्रपटांमध्ये भावना हव्या होत्या. त्यामुळे मला हा चित्रपट आवडला. साजिद सरांनी सगळ्यात आधी मला चित्रपटासाठी फोन केला होता. त्यांनी मला सांगितलं की तुझ्यासाठी माझ्याकडे काही चांगलं आहे. त्यावेळी मला कास्टिंगविषयी काही माहित नव्हतं. मी सांगितलं की मी नरेशन पाहायला हवं. मी त्यावेळी दुसऱ्या प्रोजेक्टचं शूटिंग करत होते."  

हेही वाचा : 'आम्ही खूप कॉन्ट्रोव्हर्सी पाहिल्या आता...', सगळ्यांसमोर हात जोडतं असं का म्हणाला सलमान खान?

पुढे रश्मिका म्हणाली की "जेव्हा पहिल्यांदा मला पटकथा ऐकवली, तेव्हा मला चित्रपटाच्या कथेवर प्रेम झालं. त्यानंतर मी चित्रपटाच्या स्टारकास्टविषयी विचारलं. त्यांनी जेव्हा सलमान खानच्या नावाचा उल्लेख केला तेव्हा मी स्वत: लाच प्रश्न करू लागली की हा चित्रपट माझ्यापर्यंत कसा पोहोचला."

About the Author