वडील फिल्ममेकर, तरीही लेकीचा संघर्ष; खिशात 1 रुपया घेऊन केला प्रवास, 90च्या टॉप अभिनेत्रीचा खुलासा
Raveena Tandon: रवीना टंडन हिने एका मुलाखतीत तिच्या सुरुवातीच्या काळातील आठवणींना उजाळा दिला आहे. ती तिच्या संघर्षाच्या दिवसांबाबत भरभरुन बोलली आहे.
Raveena Tandon: 90 चे दशक गाजवणारी, अनेकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या या अभिनेत्रीलाही एकेकाळी स्ट्रगलचा सामना करावा लागला होता. तिने तिच्या करिअरमध्ये अनेक संकटाचा सामना करुन यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळख मिळवली. ही अभिनेत्री आहे रवीना टंडन. 90 च्या दशकात बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री होती. तिने तिच्या करिअरमध्ये अंदाज अपना अपना, दिलवाले आणि मोहरासारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.आजही ती सिनेसृष्टीत सक्रीय आहे. त्याचबरोबर ओटीटीमध्येही तिचा जलवा दाखवत आहे. रवीन टंडन ही लोकप्रिय दिग्दर्शक आणि निर्मात्यांची मुलगी आहे. हे अनेकांना माहिती नाहीये.
रवीना टंडन बॉलिवूडचे दिवंगत दिग्दर्शक आणि निर्माते रवि टंडन यांची मुलगी आहे. रवी टंडन यांनी 70 व 80 च्या दशकात अनेक हिट मुव्ही दिल्या होत्या. लोकप्रिय फिल्ममेकरची मुलगी असूनही रविनाने बॉलिवूडमध्ये काम मिळवण्यासाठी संघर्ष केला आहे. एका मुलाखतीत तिने तिचे स्ट्रगलच्या दिवसांबाबतही व्यक्त झाली आहे. अभिनेत्रीने म्हटलं आहे की, रवि टंडन फिल्ममेकर असूनही इंड्रस्टीत माझा कोणीही गॉडफादर नव्हता. मला स्वतःलाच माझा मार्ग निवडावा लागला. वडिलांनी मला अभिनेत्री बनण्यासाठी कोणतीही मदत केली नाही. त्यांनी मला फक्त गाइड केले, असं ती म्हणते.
रवीना टंडन हिने खुलासा केला आहे का, सुरुवातीच्या दिवसात मला अभिनेत्री म्हणून करिअर करायचे नव्हते. मात्र, मला एका शॅम्पूसाठी जाहिरात करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीमुळंच माझं आयुष्य बदललं. एका मुलाखतीत तिने म्हटलं आहे की, माझ्यासाठी वडिलांनी कधीच कोणाकडे शब्द टाकला नाही. त्यांनी मला फक्त काय चुकीचं आहे व काय बरोबर याची शिकवण दिली आणि समोर आलेल्या परिस्थिती कशी हाताळायची हे समजावले. पण माझं करिअर मी स्वतःच बनवले आहे. माझा कोणीही गॉडफादर नव्हता. जे काही काम मिळाले ती माझी नियती होती, असं रवीनाने म्हटलं आहे.
रवीनाने पुढे म्हटलं आहे की, मी आयुष्यात जे काही कमावलंय ते माझ्या हिमतीवर कमावलं आहे. यावेळी रवीनाने तिचे संघर्षाचे दिवसांनाही उजाळा दिला आहे. सुरुवातीला बसमधूनही प्रवास करावा लागत होता. प्रत्येकजण कठिण काळातून जात असतो. माझ्या वडिलांनीही खूप खडतर प्रसंगांचा सामना केला. मी पण कित्येकदा बसमध्ये प्रवास केला आहे. तेव्हा बसच्या भाड्यासाठी फक्त 1 रुपया माझ्या खिशात असायचा. मी त्या परिस्थितीतूनही गेले आहे. पैसे कमवण्यासाठी खडतर मेहनत केली आहे.