90 च्या दशकात बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणाऱ्या अनेक कलाकारांचा सध्या पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दमदार कमबॅक होताना दिसत आहे. याच यादीत लोकप्रिय अभिनेत्री महिमा चौधरीचं नाव आघाडीवर आहे. ‘परदेस’, ‘धडकन’सारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी महिमा सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने तिनं केवळ तिच्या करिअरबद्दलच नाही, तर तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही मोकळेपणाने भाष्य केलं आहे.
काही महिन्यांपूर्वी महिमा चौधरी लग्नाच्या पोशाखात सार्वजनिक ठिकाणी दिसली होती. या फोटोंमुळे तिच्या दुसऱ्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं होतं. सोशल मीडियावर हे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते आणि चाहत्यांमध्येही उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र काही दिवसांतच या चर्चांमागचं सत्य समोर आलं. हे फोटो तिच्या आगामी चित्रपट ‘दुर्लभ प्रसाद की दुसरी शादी’च्या प्रमोशनचा भाग असल्याचं स्पष्ट झालं. या चित्रपटात महिमा अभिनेता संजय मिश्रा यांच्या दुसऱ्या पत्नीची भूमिका साकारताना दिसणार आहे.
चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत महिमा चौधरीने तिच्या वैयक्तिक आयुष्यावर, घटस्फोटावर आणि दुसऱ्या लग्नाच्या विचारांवर स्पष्ट आणि परखड मत मांडलं. महिमा म्हणाली की, तिचं पहिलं लग्न यशस्वी ठरलं नसलं तरी तिनं आजही लग्नसंस्थेवरचा विश्वास गमावलेला नाही. 'माझं बॉबी मुखर्जीसोबतचं लग्न टिकू शकलं नाही, पण त्यामुळे मी लग्नावरचा विश्वास सोडलेला नाही. आयुष्यात पुन्हा संधी मिळाली, तर मी नक्कीच दुसऱ्या लग्नाचा विचार करेन. मी हार मानणाऱ्यांपैकी नाही,' असं ती म्हणाली.
महिमानं यावेळी तिच्या घटस्फोटाविषयीही महत्त्वाचा खुलासा केला. तिनं सांगितलं की, २०१३ मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेऊनही तिचा घटस्फोट अद्याप न्यायालयात प्रलंबित आहे. 'मी माझ्या आई-वडिलांचं अनेक वर्षं टिकलेलं प्रेमळ वैवाहिक आयुष्य पाहिलं आहे. त्यामुळे घटस्फोट हा शब्द माझ्यासाठी कधीच सोपा नव्हता. पण जेव्हा परिस्थिती असह्य होते, तेव्हा स्वतःसाठी योग्य वेळी निर्णय घेणं गरजेचं असतं,' असं मत तिनं व्यक्त केलं. पुढे बोलताना महिमा चौधरीने सांगितलं की, चुकीच्या नात्यात अडकून राहण्यापेक्षा भावनिक, मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या स्वतःसाठी योग्य तो मार्ग निवडणं अधिक महत्त्वाचं असतं. “अशा परिस्थितीत वेळेवर बाहेर पडणं हेच योग्य ठरतं,” असंही ती म्हणाली.
तसंच, तिच्या मुलीबद्दल बोलताना महिमानं भावनिक शब्दांत सांगितलं की, तिची मुलगी आता 18 वर्षांची आहे आणि आयुष्यात एक आधार, एक साथ असणं महत्त्वाचं वाटतं. 'माझ्या आयुष्यात पुन्हा प्रेम आणि समजूतदारपणा असेल, तर मी नक्कीच दुसऱ्या लग्नाचा विचार करेन,' असंही महिमानं स्पष्ट केलं. दरम्यान, ‘दुर्लभ प्रसाद की दुसरी शादी’ या चित्रपटातून महिमा चौधरी दीर्घ काळानंतर एका महत्त्वाच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. तिचा हा कमबॅक आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल केलेली स्पष्ट भूमिका यामुळे सध्या ती पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.
FAQ
महिमा चौधरी सध्या कोणत्या चित्रपटामुळे चर्चेत आहे?
महिमा चौधरी सध्या ‘दुर्लभ प्रसाद की दुसरी शादी’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती अभिनेता संजय मिश्रा यांच्या दुसऱ्या पत्नीची भूमिका साकारत आहे.
महिमा चौधरीच्या दुसऱ्या लग्नाच्या चर्चांमागचं सत्य काय आहे?
महिमा लग्नाच्या कपड्यांमध्ये स्पॉट झाल्यामुळे तिच्या दुसऱ्या लग्नाच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र हे फोटो चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग असल्याचं नंतर स्पष्ट झालं.
दुसऱ्या लग्नाबाबत महिमा चौधरीचं मत काय आहे?
महिमा चौधरीने सांगितलं की तिचं पहिलं लग्न यशस्वी झालं नसलं तरी तिचा लग्नसंस्थेवर विश्वास कायम आहे. योग्य वेळी आणि योग्य व्यक्ती भेटल्यास ती दुसऱ्या लग्नाचा विचार करायला तयार आहे.
कावेरी पिंपळे सध्या ‘झी २४ तास डिजिटल’मध्ये कंटेंट एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना पत्रकारितेचा चार वर्षांचा अनुभव आहे.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.